14/03/26

गणित/ विज्ञान विषयाच्या रूपांतरणाच्या  मागणीसाठी सोमवार पासून शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

गणित/ विज्ञान विषयाच्या रूपांतरणाच्या  मागणीसाठी सोमवार पासून शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण

बीड दि.२६(प्रतिनिधी)-बीड जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असलेल्या 74 भाषा व सामाजिक शास्त्र विषयाच्या प्राथमिक पदवीधर शिक्षकांनी सेवांतर्गत बीएससी पदवी उत्तीर्ण झाल्याने विषय रूपांतरणची मागणी करून गणित/ विज्ञान विषय बदलून न दिल्याने या शिक्षकांनी सोमवार पासून बेमुदत उपोषणाचा इशारा जिल्हाधिकारी यांना दिलेल्या पत्रकांद्वारे दिला आहे.
या बाबत अधिक माहिती अशी की गेल्या आठ महिन्यापासून बीड जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक पदवीधर पदावर कार्यरत असलेले 74 भाषा व सामाजिक शास्त्र विषयाचे प्राथमिक पदवीधर शिक्षक सेवांतर्गत बीएससी पदवी उत्तीर्ण झाल्याने विषय रूपांतरणची मागणी करून गणित/ विज्ञान विषय बदलून देण्याचे मागणी करत आहेत .परंतु बीड जिल्हा परिषद मध्ये संबंधितांच्या मागणीची कसल्याही प्रकारे दखल न घेतल्यामुळे संबंधित शिक्षकांनी न्याय मागण्यासाठी उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद येथे रिट याचिका क्रमांक 4461/2025 अन्वये दाद मागितली असता उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी दिनांक 3 एप्रिल 2025 रोजी दिलेले आदेशान्वये संबंधित शिक्षकांच्या विषय रूपांतरण प्रश्न दोन आठवड्यात मार्गी लावण्याचे आदेश दिले होते.  न्यायालयाचे आदेशानंतरही जिल्हा परिषद प्रशासनाने त्याची कसली ही दखल घेतली नाही म्हणून संबंधित 74 प्राथमिक पदवीधर शिक्षक गणित /विज्ञान विषय रूपांतरण मागणी व बदली पोर्टलवर विषय बदल करण्याच्या मागणीसाठी सोमवार दिनांक 28 /4 /2025 पासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करणार आहेत

Check Also

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील …