14/03/26

संपादक जितेंद्र सिरसाट यांना पितृशोक! कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

संपादक जितेंद्र सिरसाट यांना पितृशोक!

कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे वृद्धापकाळाने दुःखद निधन

बीड दि.१०(प्रतिनिधी)- संपादक जितेंद्र सिरसाट यांचे वडील कान्होजी लिंबाजी सिरसाट यांचे बुधवार दिनांक १० रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. निधनासमयी त्यांचे वय ८१ वर्ष होते.
बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील मूळ रहिवासी व सध्या संत नामदेव नगर भागात रहिवासी असलेले सायं. दैनिक वास्तवचे संपादक जितेंद्र सिरसाट यांचे वडील कान्होजी लिंबाजी सिरसाट हे अतिशय मनमिळाऊ स्वभावाचे होते. त्यांना पिंपळनेर आणि बीड परिसरात ‘दादा’ या नावाने ओळखले जात होते. ते महावितरण मध्ये सेवा करून सेवानिवृत्त झाले होते. त्यांच्यावर फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचा मोठा प्रभाव होता. बुधवार दिनांक १० रोजी दररोजच्या प्रमाणे घरी आराम करत असताना अचानक रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने त्यांची प्राणज्योत मालवली. निधनासमयी त्यांचे वय ८१ वर्ष होते. आज गुरुवार दिनांक ११ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास भगवान बाबा प्रतिष्ठानच्या मागे असलेल्या स्मशान भूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या पश्चात दोन मुले, सुना, तीन मुली, जावाई नातू पणतू असा मोठा परिवार आहे. सिरसाट परिवाराच्या दुःखात संघर्ष यात्रा परिवार सहभागी आहे.

 

Check Also

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील …