14/03/26

दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील फळबागा जगविण्यासाठी शासनाने प्रतिहेक्टरी एक लाखाची मदत करावी :- बाजीराव ढाकणे* *मराठवाडा पाणी परिषदेची आग्रहाची मागणी*

*दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील फळबागा जगविण्यासाठी शासनाने प्रतिहेक्टरी एक लाखाची मदत करावी :- बाजीराव ढाकणे*

*मराठवाडा पाणी परिषदेची आग्रहाची मागणी*

बीड दि.१९( प्रतिनिधी):- मराठवाड्यात यावर्षी अल्प प्रजन्यमानामुळे भूजल पातळी खालावलेली असून पाण्याअभावी फळबागा जळुन चालल्या आहेत त्यामुळे फळबागा तोडाव्या लागत आहेत. त्यातच 9 ते 14 एप्रिल 2024 दरम्यान मराठवाड्यातील काही भागात झालेल्या अवकाळी गारपीट पावसामुळे मोठ्या प्रमाणात फळबागाचे नुकसान झाले आहे. सरसकट सर्व फळबागधारक शेतकऱ्यांचे पंचनामे करून *प्रति हेक्टरी एक लाखाची मदत करावी* अशी निवेदनाद्वारे मागणी मराठवाडा पाणी परिषदेचे बीड जिल्हा प्रमुख बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. शासनाने मदत नाही केल्यास मराठवाड्यातील फळबागा नामशेष होतील व ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडून पडेल. शासनाने त्वरित फळबाग धारक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी *प्रती हेक्टरी एक लाखाची मदत करावी याबाबतचे कृषी सहसंचालकांना निवेदन देण्यात आले, यावेळी मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, बीड जिल्हा प्रमुख बाजीराव ढाकणे* उपाध्यक्ष मनोहर सरोदे, रविंद्र बोडके, रविंद्र सातदिवे, अनिल चौधरी, भाऊसाहेब मते, संदीप शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मराठवाड्यातील फळबागा जगविण्यासाठी सरकारने तातडीने पावले उचलली पाहिजेत तरच फळबागा जगतील अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदचे बाजीराव ढाकणे यांनी केली आहे.
मराठवाड्यातील अनेक फळबागा पाण्या अभावी जळुन चालल्या आहेत. सरकारने या फळबागांना टॅंकर द्वारे पाणी उपलब्ध करून द्यावे अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदचे बाजीराव ढाकणे यांनी केली आहे. या वेळी पुढे ढाकणे म्हणतात की, मराठवाड्यातील फळबागा जगविण्यासाठी सरकारी पातळीवर उपाययोजना केल्या पाहिजेत अन्यथा ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी फळबागा हे नगदी व हमखास उत्पन्न देणारे साधन आहे. कृषी उद्योगांना कच्चा माल देण्याचे काम फळबाग धारक शेतकरी करत असतात. परंतु मराठवाड्यातील सततच्या दुष्काळाची परिस्थिती आणि फळ पिकांवरील रोगराई यामुळे फळबागायतदार शेतकरी त्रस्त आहे. दुष्काळाच्या छायेत सापडलेल्या फळबाग धारकांना शासनामार्फत आर्थिक मदत झाली पाहिजे तरच मराठवाड्यातील फळबागा वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना दिलासा मिळेल नसता सर्व फळबागा नामशेष होतील म्हणजेच मराठवाड्यातील ग्रामीण अर्थव्यवस्था कोलमडेल अशी भीतीही या वेळी बाजीराव ढाकणे यांनी व्यक्त केली.

Check Also

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील …