23/08/26

वडिलांच्या पुण्यस्मृतींना अनोखी मानवंदना!* *पुण्यतिथीला वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न; पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी जपला वडिलांच्या मायेचा वारसा स्वर्गीय प्रकाश राठोड यांच्या स्मृतींना अन्नदानातून भावपूर्ण श्रद्धांजली*

*वडिलांच्या पुण्यस्मृतींना अनोखी मानवंदना!*

*पुण्यतिथीला वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न; पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी जपला वडिलांच्या मायेचा वारसा स्वर्गीय प्रकाश राठोड यांच्या स्मृतींना अन्नदानातून भावपूर्ण श्रद्धांजली*

दिग्रस दि.१२(संतोष राठोड): आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आठवणी मनात कायम जिवंत राहतात. मात्र, त्या आठवणींना सामाजिक सेवेची जोड देत त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली अर्पण करण्याचा संवेदनशील उपक्रम पत्रकार जय प्रकाश राठोड यांनी केला. स्वर्गीय प्रकाश राठोड, रा. आरंभी, यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज मंगळवार दिं. 11 ऑगस्ट 2026 रोजी उमरी पठार येथील वृद्धाश्रमातील वृद्धांना अन्नदान करण्यात आले.
वडिलांच्या पुण्यतिथीचा दिवस केवळ स्मरणदिन न ठेवता गरजू आणि निराधार ज्येष्ठांच्या सेवेसाठी समर्पित करण्यात आला.
वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न वाढताना त्यांच्या चेहऱ्यावर उमटलेले समाधान आणि आपुलकीचे भाव हेच स्वर्गीय प्रकाश राठोड यांच्या स्मृतींना मिळालेले खरे समाधान असल्याची भावना यावेळी व्यक्त झाली.
ज्यांच्या हातून आपले बालपण घडते, त्यांच्या स्मृतींना समाजसेवेच्या माध्यमातून अभिवादन करण्याचा हा प्रयत्न मन हेलावून टाकणारा ठरला. वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या सुख-दुःखाची विचारपूस करण्यात आली. काही काळ त्यांच्यासोबत वेळ घालवत पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला.
आजच्या धावपळीच्या जीवनात वृद्ध आई-वडिलांकडे दुर्लक्ष होत असताना, पुण्यतिथीच्या निमित्ताने वृद्धाश्रमातील ज्येष्ठांना अन्नदान करण्याचा हा उपक्रम समाजाला ‘वृद्धांची सेवा हीच खरी मानवसेवा’ असा भावनिक संदेश देऊन गेला.

स्वर्गीय प्रकाश राठोड यांच्या स्मृतींना अभिवादन करताना त्यांच्या मुलाने माणुसकीचा वारसा पुढे नेण्याचा घेतलेला हा संकल्प उपस्थितांच्या मनाला भावला. पुण्यतिथीनिमित्त करण्यात आलेल्या या अन्नदानातून वडिलांप्रती असलेले प्रेम, कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम पाहायला मिळाला.

Check Also

शिक्षकांच्या २० वर्षांच्या संघर्षाचा आज फैसला! टप्पा वाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आज ११ वाजता महत्त्वपूर्ण बैठक!

शिक्षकांच्या २० वर्षांच्या संघर्षाचा आज फैसला! टप्पा वाढीबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत आज ११ …