14/03/26

रोहन राहुल डोके वर्ल्ड अबॅकस टॉपर्स. अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये रोहन राहुल ढोकेने मिळवले सर्वोत्कृष्ट वर्ल्ड चॅम्पियन टॉपर्स मानद शिल्ड

रोहन राहुल डोके वर्ल्ड अबॅकस टॉपर्स

अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये रोहन राहुल ढोकेने मिळवले सर्वोत्कृष्ट वर्ल्ड चॅम्पियन टॉपर्स मानद शिल्ड

बीड दि.१४ (प्रतिनिधी) विद्यार्थ्यांच्या मनाप्रमाणे विषय ज्ञान देण्यात आल्यास अधिकाधिक विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होतो. विविध स्पर्धेमधूनच विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडत असते. शालेय स्तरावरील सर्वांगिण विकास करण्याच्या मार्गाने अबॅकस गणितीय पध्दतीचा उपयोग असून विद्यार्थ्यांना मिळालेले यशाची प्रमाणपत्र भविष्यात उपयोगात यावेत म्हणून अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख श्री डॉ.घोडके ए. एस. यांनी प्रत्येक चॅम्पियनशिपचे प्रमाणपत्र विद्यार्थ्यांच्या भविष्यात उपयोग व्हावा अशाच जागतिक आणि राष्ट्रीय स्तरावरील संघटनेमध्ये मानद सदस्य मिळवून विद्यार्थ्यांना संधी उपलब्ध करून दिलेली आहे जी की सर्व स्तरावरती मान्यताप्राप्त आहेत. जागतिक स्तरावरील ज्ञान असोसिएशनच्या अबॅकस चॅम्पियनशिपमध्ये मास्टर रोहन राहुल ढोकेने सर्वोत्कृष्ट टॉपर रँकिंग मिळवून ऐतिहासिक यश मिळवलेले आहे. शहरातील अबॅकस ट्रेनिंग केंद्राद्वारे, आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय , राज्य स्तरावर, अबॅकस चॅम्पियनशिप आयोजित केल्या जातात. भारत देशाच्या 26 मे 2024 ज्ञान असोसिएशनच्या वर्ल्ड अबॅकस चॅम्पियनशिप घेण्यात आलेल्या होत्या. जगातील 13 देशांनी घेतलेल्या एकूण 2000 विद्यार्थ्यांमध्ये भारत, यु अँड इ म्यानमार, इंटरनॅशनल स्तरावरील ऑनलाइन अबॅकस चॅम्पियनशिप आणि आंतरराष्ट्रीय परिषदेत केरळ राज्यातील अबॅकस असोसिएशन यांच्या सहकार्याने जागतिक स्तरावरील अबॅकस स्पर्धा स्पर्धांचा निकाल जाहीर झालेला असून त्यामध्ये रोहन राहुल ढोके याने सर्वोत्कृष्ट जागतिक टॉपर्स शिल्ड मेडल प्रमाणपत्र मिळालेलं असून अबॅकसच्या किड्स लेवलच्या रॅक स्पर्धेमध्ये रोहन राहुल ढोकेची जागतिक स्तरावर निवड झालेली आहे. बीडच्या सुपर जिनियस रोहन राहुल ढोके ने सहभाग घेत उत्कृष्ट विजयी सर्वोत्कृष्ट बक्षीस आणि प्रमाणपत्र मिळविले असून इंटरनॅशनल अबॅकस स्पर्धेमध्ये गेल्या चार ते पाच महिन्यापासून सतत प्रयत्न करत असल्यामुळे त्याला यश मिळालेली आहे. या कामी त्याला त्यांच्या पालकांनी, शिक्षकांनी सतत योग्य ते मार्गदर्शन करून यश प्राप्त करण्यास सहकार्य केलेली आहे. अबॅकस तथा वैदिक गणित मार्गदर्शक डॉ.एस ए घोडके यांनी त्यांना सतत गणितामधील असलेल्या अडचणी दूर करण्यास प्रयत्न केलेले आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे अबॅकस स्टडी सेंटरचे प्रमुख डॉ. घोडके एस ए. यांच्यासह त्याचे आई-वडील, मित्रपरिवार नातेवाईकांनी अभिनंदन करून त्यांच्या पुढील असून उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. जागतिक स्तरावरील युनायटेड किंग्डम जागतिक अबॅकस चॅम्पियनशिप आणि सप्टेंबर 2024 जागतिक अबॅकस ऑनलाइनची निवड झालेली आहे असे जिल्हा अबॅकस वितरक एस. ए. घोडके यांनी सांगितले.

*चौकट*

अबॅकस आणि वैदिक मॅथमुळे विद्यार्थ्यांचा गणितामधील आवड निर्माण होऊन गणिताबद्दलची मनात असलेली भीती नष्ट होऊन अनेक क्लिष्ट अशा गणितीय पद्धती सोप्या पद्धतीने सोडवल्यासाठी विद्यार्थ्यांना आत्मविश्वास, स्मरणशक्ती यांचा विकास करण्यासाठी अबॅकसचा उपयोग केला जातो असे जिल्हा अबॅकस वितरक घोडके एस ए यांनी सांगितले आहे*

Check Also

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील …