14/03/26

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून

प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा – पुरुषोत्तम वीर

लिंबागणेश सर्कल वंचितचे पुरुषोत्तम वीर यांनी काढला पिंजून

बीड दि.८(प्रतिनिधी) – बीड मतदार संघ हा विकासापासून कोसो दूर आहे. ना चांगले रस्ते आहेत, ना आरोग्य सुविधा, ना पिण्याच्या पाण्याची सोय असे अनेक प्रश्न या प्रस्थापित नेत्यांना कधी महत्त्वाचे वाटले नाही. स्वतःचे घर भरणे हाचा यांचा एकमेव कार्यक्रम राहिलेला आहे. दहा-पाच बगलबच्चे पोसणे म्हणजे विकास नव्हे. गावागावात या प्रस्थापित नेत्यांना व उमेदवारांना जाब विचारा. ही पायघड्या घालण्याची वेळ नाही.असेही पत्रकात वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर यांनी म्हटले आहे. त्यांचे पक्ष भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. दीड हजारात लाडकी बहीण खरेदीचा धूर्त शक्कल हाणून पाडा. पक्षाची प्रतिमा पाहून मतदान करा. सत्तेचे रक्त तोंडाला लागलेल्या या प्रस्थापित नेत्यांना कायमचे हद्दपार करा. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. अशी वेळ आली आहे. तुमच्या लेकरांचे भवितव्य उज्वल करणारी ही निवडणूक आहे. फसव्या भूलथापांना बळी पडू नका तुम्ही ठरवलं तर अशक्य काहीच नाही. यावेळी त्यांना इंगा दाखवाच सर्वोत्तम पर्याय तुमच्या समोर आहे. बीड मतदार संघाचे नंदनवन करण्यासाठी गॅस सिलेंडर चिन्हावर मतदान करा,असे पत्रकात वंचित बहुजन आघाडीचे बीड विधानसभेचे उमेदवार पुरुषोत्तम उर्फ गोटू वीर यांनी म्हटले आहे.

Check Also

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील …