14/03/26

अनिलदादा जगताप यांच्या कुटुंबियांडून संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे पाटीलांचे जंगी स्वागत!

अनिलदादा जगताप यांच्या कुटुंबियांडून संघर्षयोद्धा मनोजदादा जरांगे पाटीलांचे जंगी स्वागत!

बीड दि.१७(प्रतिनिधी)- संघर्षयोद्धा सन्मानीय मनोजदादा जरांगे पाटील यांचे आज रविवार दि. 17 नोव्हेंबर रोजी बीडमध्ये आगमन होताच बीड विधानसभा अपक्ष उमेदवार अनिलदादा जगताप यांचे कुटुंबिय तथा सहकाऱ्यांकडून मनोजदादा जरांगे पाटील यांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्वप्रथम जगताप कुटुंबातील सर्व महिलांनी मिळून मनोजदादा यांचे औक्षण केले. त्यानंतर अनिलदादा जगताप यांचे बंधू किशोर जगताप, विजय जगताप आणि चिरंजीव आकाश जगताप यांनी मनोजदादा यांच्या गळ्यात पुष्पहार घालून हृदय सत्कार करत त्यांचे जंगी स्वागत केले व मनोजदादांच्या पाया पडून आशीर्वाद घेतले. यादरम्यान अनिलदादा यांचे सहकारी कार्यकर्ते समर्थक मित्रपरिवाराने फटाक्यांची आतिषबाजी केली. सर्व समन्वयक मराठा सेवकांच्या प्रमुख उपस्थितीत मोठ्या हर्षल्हासात संघर्षयोद्धाचा स्वागतविधी मोठ्या थाटामाटात संपन्न झाल्याने उपस्थितांमध्ये प्रचंड उत्साह संचारल्याचे दिसून येत होते. जरांगे पटलांच्या आगमनी बीडकरांची देखील मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
°°°°°

Check Also

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील …