17/04/26

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्षपदी गितांजली लव्हाळे यांची नियुक्ती

वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेची बैठक संपन्न

मराठी पत्रकार परिषदेच्या
वडवणी शहराध्यक्षपदी गितांजली लव्हाळे यांची नियुक्ती

वडवणी दि. 26 (प्रतिनिधी)-
परभणी जिल्ह्यातील सेलू येथे फेब्रुवारी रोजी होणाऱ्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा व राज्यस्तरीय मेळाव्यास महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यासह बीड जिल्ह्यातील आणि वडवणी तालुक्यातील सर्व पत्रकारांनी मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले. यावेळी
मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी
शहराध्यक्षपदी पत्रकार गितांजली लव्हाळे मॅडम यांची सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आल्याची घोषणा अनिल वाघमारे यांनी केली.
याबाबत अधिक वृत्त असे की,
मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांच्या सुचनेनुसार डीजिटल मीडिया परिषदेचे राज्य अध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीत
राज्यातील डिजिटल मिडिया परिषदेचे राज्य कार्यकारिणी पदाधिकारी व जिल्हाध्यक्षांनी सेलू येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय मेळाव्यात सहभागी व्हावे असे आवाहन केले. त्याच बरोबर वडवणी तालुक्याचे जेष्ठ मार्गदर्शक पत्रकार सुधाकर पोटभरे, तालुकाध्यक्ष सतिश सोनवणे, सचिव महेश सदरे यांच्या मागणीनुसार मराठी पत्रकार परिषदेच्या वडवणी शहराध्यक्षपदी पत्रकार गितांजली लव्हाळे मॅडम यांची तर वडवणी तालुका मराठी पत्रकार परिषदेच्या सदस्यपदी पत्रकार राम चौरे यांची निवड करण्यात आली. या निवडीनंतर लव्हाळे मॅडम आणि पत्रकार राम चौरे यांचा यथोचित सत्कार करुन दोघांनाही शुभेच्छा दिल्या.
यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे म्हणाले की, मराठी पत्रकार परिषद ही आपली मातृसंस्था आहे. राज्यांतील पत्रकारांच्या हितासाठी सदैव तत्पर असणारे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख यांचे हात बळकट करणे आपले कर्तव्य आहे. ज्या ज्या वेळी राज्यातील पत्रकार अडचणीत सापडतात त्या त्या वेळी मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, विश्वस्त शरद पाबळे, अध्यक्ष मिलिंद अष्टीवकर सह राज्यस्तरीय पदाधिकारी तत्पर असतात. त्यामुळेच राज्य सरकारचे मराठी पत्रकार परिषदेवर विशेष लक्ष असते हे सर्वश्रुत आहे. मराठी पत्रकार परिषदेचा सेलू जिल्हा परभणी येथे आयोजित करण्यात आलेल्या आदर्श जिल्हा व तालुका पत्रकार संघाच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात आपण सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी केले. यावेळी जेष्ठ पत्रकार सुधाकर पोटभरे, तालुकाध्यक्ष सतिश सोनवणे सचिव महेश सदरे यांनी देखील आपल्या महत्त्वाच्या सूचना मांडल्या.
यावेळी तालुका कोषाध्यक्ष वाजेद पठाण, डिजिटल मिडिया परिषदेचे अध्यक्ष ओमप्रकाश साबळे, तालुका उपाध्यक्ष धम्मपाल डावरे, पत्रकार हरी पवार, पत्रकार अतुल जाधव, पत्रकार संभाजी लांडे, पत्रकार राम चौरे, पत्रकार विजय राऊत,पत्रकार हर्षद उंडाळकर सह आदींची उपस्थिती होती.

Check Also

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप …