17/04/26
Oplus_131072

मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड

मराठी प्राध्यापक महासंघाच्या सहसचिवपदी प्रा.विनोद गलांडे यांची निवड

बीड दि.२३(प्रतिनिधी)-महाराष्ट्र राज्य मराठी भाषा विषय शिक्षक आणि महासंघाच्या बीड जिल्हा कार्यकारिणीत प्रा. विनोद गलांडे यांची बीड जिल्हा सहसचिवपदी निवड करण्यात आली. प्रा.विनोद गलांडे यांची निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
शिवजन्मोत्सवाचे औचित्य साधून
कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या राज्य कार्यकारिणीच्या वतीने मराठी विषय शिक्षक महासंघाची बीड जिल्हा कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. बीड जिल्हाध्यक्षपदी प्रा. डाॅ. अशोक देवगुडे, सचिवपदी प्रा. बिभिषण चाटे तर सह सचिवपदी प्रा. विनोद गलांडे यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नुतन कार्यकारिणीचा यथोचित सत्कार करण्यात आला. यावेळी प्रा. विनोद गलांडे यांचा सत्कार प्रा. इंंजि. उमेशजी बनसोडे, श्री.विष्णु गवई, श्री.तानाजी सोनवणे (सर) आयुष गवई, यांनी करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. त्यानंतर सत्काराला उत्तर देताना प्रा. विनोद गलांडे यांनी
पुढील काळात मराठी भाषा विषयाची वाढ,विकास आणि संवर्धनासाठी व विविध मागण्यांच्या अनुषंगाने कार्य करणार असल्याचे सांगितले.
बीड जिल्हा सहसचिवपदी निवड झाल्याबद्दल प्रा. विनोद गलांडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

Check Also

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप …