यशवंत विद्यालयाच्या मीरा लांडगे मॅडम
आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित
सर्व स्तरातून होतोय अभिनंदनचा वर्षाव!
बीड दि.6 (प्रतिनिधी)-बीड शहरातील यशवंत विद्यालयात कार्यरत असणाऱ्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती मीरा बबनराव लांडगे मॅडम यांना या वर्षीचा पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणारा राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झाला होता. रविवार दिनांक 4 मे रोजी मान्यवरांच्या शुभहस्ते सदरील पुरस्कार देऊन श्रीमती लांडगे मॅडम यांना सन्मानित करण्यात आले. सदरील आदर्श राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती मीरा लांडगे मॅडम यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.
बीड शहरातील पद्मपाणी प्रतिष्ठानच्या वतीने मागील १७ वर्षापासून संविधान दिनाचे औचित्य साधून समाजातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या गुणीजणांचा पद्मपाणि प्रतिष्ठानच्या वतीने “पद्मपाणि” राष्ट्रीय, राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान केला जातो. या वर्षीच्या दिल्या जाणाऱ्या विविध राज्य राष्ट्रीय पुरस्कारासाठी बीड जिल्ह्यासह राज्यातील
विविध क्षेत्रातील गुणवंत आणि कर्तुत्ववान गुणीजणांची निवड करण्यात आली
होती. यामध्ये राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी बीड शहरातील यशवंत विद्यालयाच्या विद्यार्थी प्रिय शिक्षिका श्रीमती मीरा बबनराव लांडगे मॅडम यांची निवड करण्यात आली होती. सदरील या मानाच्या पुरस्काराचे वितरण रविवार दिनांक 04 मे रोजी बीड शहरातील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये भव्यदिव्य कार्यक्रमात थाटामाटात दै लोकाशाचे संपादक विजयराज बंब, बीड तहसीलचे तहसीलदार चंद्रकांत शेळके,
नायब तहसीलदार सुहास हजारे, जिल्हा न्यायालयाचे ज्येष्ठविधीज्ञ जयंतराव राख, वाहतूक शाखेचे जिल्हा पोलीस निरीक्षक सुभाष सानप, उपशिक्षणाधिकारी नानाभाऊ हजारे, प्राथमिक शिक्षण विभागाच्या उपशिक्षणाधिकारी मैनाताई बोराडे मॅडम, वडवणीचे कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी बाबासाहेब उजगरे, शालेय संस्थाचे अध्यक्ष उत्तमराव पवार सर, शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा यशवंत विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक गणेश वाघ सर, शिरूर तालुक्यातील ज्येष्ठ साहित्यिक विठ्ठल जाधव, महाविद्यालय खोलेश्वर महाविद्यालयाचे उपप्राचार्य तथा साहित्यीक गौतम गायकवाड, पद्मपाणि प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा संपादक दिलीप तरकसे, प्रतिष्ठानच्या सचिव सिंधुताई तरकसे, सामाजिक कार्यकर्त्या सीमा ओस्तवाल मॅडम, समाज कल्याण वरिष्ठ निरीक्षक सहाय्यक आयुक्त कविता गायकवाड मॅडम, महाराष्ट्र राज्य विद्युत कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष नवनाथ पोटभरे, चंपावती विद्यालयाचे सेवानिवृत्त प्राचार्य हौसराव पवार , रायमोहाचे विद्यमान सरपंच तथा उद्योजक सुभाष क्षीरसागर, लोकशाही पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य, ऍड राजेश तांगडे, प्राचार्य देवीदास निकाळजे सर, ग्रामपंचायत अधिकारी विजयकुमार इंगळे, शासकीय निवासी आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिका अस्मिता जावळे या प्रमुख मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन श्रीमती मीरा बबनराव लांडगे यांना सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार मिळाल्याबद्दल श्रीमती मीरा लांडगे मॅडम यांचे शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्षा सौ सुदामतीताई वाघ, संस्थापक सचिव श्री गोविंदरावजी वाघ, संस्थेचे अध्यक्ष तथा यशवंत विद्यालयाचे आदर्श मुख्याध्यापक श्री गणेश वाघ सर, सचिव श्री नामदेवराव वाघ प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक श्री धुमाळ सर
यांच्यासह यशवंत विद्यालयाचे सर्व शिक्षकवृंद आणि शिक्षकेत्तर कर्मचारी, नातेवाईक, मित्रपरिवार यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
________________________________
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com