*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट*
*मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*
बीड दि.24(प्रतिनिधी)- शिवसेना पक्षात कधी जात पाहून काम केलं जात नाही व शिवसैनिक कधीच जात धर्म बघून जनतेचा कामासाठी पुढे जात नाहीत. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे साहेबांचे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. तसेच महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री ना. एकनाथजी शिंदे साहेब यांची स्वाभिमानी विचारधारा घेऊन आपण सर्व शिवसैनिक पुढे वाटचाल करत आहोत. त्यामुळे शिवसैनिकांनी जात-धर्म न बघता केवळ माणूस बघून सर्व सामान्य जनतेचे काम करा, जनतेच्या मनावर तुम्ही अधिराज्य गाजवाल आणि जनता तुम्हाला डोक्यावर घेऊन मिरवेल. तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल. असे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते संजयजी शिरसाट साहेब यांनी बीड जिल्हा शिवसेनेच्या आढावा बैठकीमध्ये शिवसैनिकांना संबोधित केले. तसेच उपस्थित पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करत स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत दिशा स्पष्ट केली.
काल दि. 24 रोजी दुपारी 2 : 00 वाजताच्या दरम्यान बीड शहरातील हॉटेल ग्रँड यशोदा येथे महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. श्री. संजयजी शिरसाठ साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीड जिल्हा शिवसेनेची अत्यंत महत्वपूर्ण आढावा बैठक मोठया उत्साहात संपन्न झाली. ही बैठक म्हणजे बीड जिल्ह्यात शिवसेना संघटनेच्या मजबुतीचा ठोस पुरावा ठरली. या बैठकीमध्ये शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक आणि जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांनी मंत्री महोदय ना. शिरसाट साहेबांचे बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जंगी स्वागत करत मोठ्या थाटामाटात सत्कार केला. यानंतर मंत्री ना. शिरसाट साहेबांनी उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना संबोधित केले. तसेच या बैठकीसाठी उपस्थित असणारे शिवसेना मराठवाडा विभागीय सचिव अशोकजी पटवर्धन साहेब आणि शिवसेना बीड जिल्हा संपर्कप्रमुख बापूसाहेब मोरे यांनी स्थानिक स्वराज्य निवडणुकांबाबत मार्गदर्शन केले. बैठकीचे प्रास्ताविक नवनिर्वाचित शिवसेना तालुकाप्रमुख संतोष जाधव यांनी केले तर बीड जिल्हा शिवसेनेच्या वतीने जिल्हाप्रमुख सचिन मुळूक यांनी आपल्या भाषानातून जिल्ह्याचा आढावा मांडला.
दरम्यान बैठकीत मंत्री महोदय ना. शिरसाट साहेब यांच्या शुभहस्ते नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्राचे वाटप करण्यात आले. तसेच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला आघाडी अध्यक्षा जयश्रीताई वाघमारे व बाळासाहेब खेडकर तंटामुक्ती अध्यक्ष खामगाव गेवराई यांनी मंत्री महोदय शिरसाट यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. याप्रसंगी युवासेना मराठवाडा निरीक्षक बाजीराव चव्हाण, युवा सेना मराठवाडा निरीक्षक विपुल पिंगळे, युवा सेना मराठवाडा निरीक्षक अविनाश जाधव, युवासेना बीड लोकसभा निरीक्षक सागर बहिर, महिला आघाडीच्या सह संपर्कप्रमुख अलकाताई डावकर, महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख चंद्रकलाताई बांगर, युवा सेना जिल्हाप्रमुख रविराज बडे, युवा सेना जिल्हाप्रमुख सुजित शिंदे, युवा सेनेचे गणेश शिराळे, ओबीसी वी जयंती सेनेचे जिल्हाप्रमुख मनोज चव्हाण यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शेतकरी सेना, कामगार सेना ओबीसी व्हिजेएनटीसेना तथा अंगीकृत संघटनांचे सर्व आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी यांनी बैठकीस मोठ्या संख्येने उपस्थित होते. या आढावा बैठकीचे सूत्रसंचलन प्रतिक कांबळे यांनी केले.
—–
*शिवसेना नवनियुक्त पदाधिकारी*
अमोल दिगंबर जाधव – शिवसेना उपजिल्हाप्रमुख बीड ग्रामीण, संतोष किसनराव जाधव – शिवसेना तालुकाप्रमुख बीड तालुका, ज्ञानोबा जनार्धन गोंडे – शिवसेना तालुकाप्रमुख वडवणी तालुका, गजानन दामोदर कदम – शिवसेना शहरप्रमुख बीड शहर, हनुमंत काशिनाथ शिंदे – शिवसेना शहरप्रमुख वडवणी शहर, सुनील अंकुशराव गवते – जिल्हा सहसंघटकnबीड विधानसभा, केशव बाबुराव घिघे – जिल्हा सहसंघटक माजलगाव विधानसभा. नारायण आप्पासाहेब शिंदे-शिवसेना उपजिल्हाप्रमुख गेवराई, उध्दव ज्ञानेश्वर मडके – शिवसेना तालुकाप्रमुख गेवराई, नवनाथ राजेंद्र गवते – शिवसेना विधानसभा प्रमुख गेवराई, मुकेश अंकुशराव महाजन – शिवसेना शहरप्रमुख गेवराई, सुनिल मोटे -शिवसेना शहरसंघटक गेवराई या सर्व नवनिर्वाचित शिवसेना पदाधिकाऱ्यांना मंत्री ना. संजयजी शिरसाट साहेब यांच्या शुभहस्ते नियुक्ती पत्रक देण्यात आले.
°°°°°
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com