17/04/26

राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्या थाटात होणार उद्घाटन ! उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल वाघमारे

राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्या थाटात होणार उद्घाटन !

उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित रहा- राहुल वाघमारे

बीड दि.१२( प्रतिनिधी)- राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालयाचे उद्घाटन
उद्या शनिवार दि.13 सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता फुले- शाहू- आंबेडकर कृतीशील विचारवंत प्रा. डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख यांच्या शुभहस्ते करण्यात येणार आहे. या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील जे. एन. यु. विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद आव्हाड हे राहणार आहेत. तरी या उद्घाटन सोहळ्यास बीड शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन सम्राट प्रतिष्ठानचे राहुल वाघमारे यांनी केले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बीड शहरातील शिवाजी नगर भागातील मित्र नगर परिसरात असलेल्या सावंत प्लाझामध्ये सम्राट प्रतिष्ठानच्या वतीने राजर्षी शाहू महाराज सार्वजनिक ग्रंथालय स्थापन करण्यात आले आहे. या ग्रंथालयाचे उद्घाटन फुले-शाहू-आंबेडकर कृतीशील विचारवंत प्राध्यापक डॉ. धम्मसंगिनी रमा गोरख यांच्या शुभहस्ते उद्या शनिवार दिनांक 13 सप्टेंबर रोजी पाच वाजता करण्याचे आयोजित केले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिल्ली येथील जे एन यु विद्यापीठाचे प्राध्यापक डॉ. मिलिंद आव्हाड हे राहणार आहेत. तर प्रमुख पाहुणे म्हणून युवा रिपाईचे महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष पप्पू कागदे, सत्यशोधक ओबीसी परिषद महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष संदीप उपरे, इंजिनीयर जालिंदर भोरे, कॉम्रेड नामदेव चव्हाण सर, प्राचार्य राजेंद्र मालुसरे, सुनील हुसे, प्रा.डॉ. प्रकाश कोंका, उपायुक्त जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती बीडचे उमेश सोनवणे यांच्यासह जिल्हा कृषी अधीक्षक सुभाष साळवे आदी उपस्थित राहणार आहेत. तरी या उद्घाटन सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन सम्राट प्रतिष्ठानचे राहुल वाघमारे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे केले आहे.
________________________________

Check Also

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप …