17/04/26

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी – प्रा. बबनराव आंधळे

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे शासनाने स्पॉट पंचनामे करून शेतकऱ्याला तात्काळ मदत जाहीर करावी – प्रा. बबनराव आंधळे

बीड दि.१६(प्रतिनिधी)-मागील चार-पाच दिवसापासून जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे शासनाने विलंब न करता स्पॉट पंचनामे सुरू करावेत व शेतकऱ्यांना तात्काळ मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व ग्रामीण युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. बबनराव आंधळे यांनी केली आहे.
महाराष्ट्रासह बीड जिल्ह्यामध्ये श्रावण महिन्यातच संततधार व अतिवृष्टी झाली होती त्यामुळे पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्यात पुन्हा परतीच्या पावसाने पूर्ण जिल्ह्यामध्ये पिके झोडपली आहेत. जिल्ह्यामध्ये गोदावरी बिंदुसरा अशाअनेक नद्या दुतर्फा वाहू लागल्यामुळे उभ्या पिकामध्ये शेतात पाणी गेले. त्यामुळे कापसाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गेल्या दोन दिवसात पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. शेतकरी पूर्णपणे खचला असून केलेला खर्च तरी निघतो का नाही? हा प्रश्न शेतकऱ्या पुढे निर्माण झाला आहे. शेतकरी प्रचंड आर्थिक अडचणीत आला आहे. अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाने स्पॉट पंचनामे सुरू करून कोणताही निकष न लावता सरसकट शेतकऱ्याला नुकसान भरपाई जाहीर करावी नसता जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन शासनाच्या विरोधात आंदोलन करण्याचा इशारा प्रा. आंधळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे दिला आहे.

Check Also

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप …