11/03/26

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या: श्री नामदेवराव वाघ शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा !

मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील
क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या: श्री नामदेवराव वाघ

शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा !

बीड दि. १७ (प्रतिनिधी): मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यातील क्रांतीकारकांनी ध्येयनिष्ठेने निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या होत्या. देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि मराठवाडा मुक्ती लढ्यात बलिदान देणा-या थोर देशभक्तांनी केलेले कार्य आणि त्यांनी दाखवलेला मार्ग प्रत्येक नागरिकांनी आपल्या जीवनात अंगिकारून उज्ज्वल जीवन जगावे असे आवाहन शिवनेरी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री नामदेवराव वाघ यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने शिदोड येथील श्री महालक्ष्मी विद्यालयात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना केले. यावेळी ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा बीड शहरातील प्रसिद्ध उद्योजक श्री गणेश आबा कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. या प्रसंगी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून श्री पांडुरंग भाऊ शेंडगे, श्री आकाश भाई निर्मळ, श्री दत्तात्रय चव्हाण, श्री आत्माराम वाव्हळ आदी उपस्थित होते.
बीड शहरात पासून जवळच असणाऱ्या शिदोड येथील श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम लढल्याचे प्रणेते स्वामी रामानंद तीर्थ यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर
ध्वजारोहण गावातील प्रतिष्ठित नागरिक तथा प्रसिद्ध उद्योजक श्री गणेश आबा कदम यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्या नंतर आलेल्या मान्यवरांच्या स्वागत समारंभ नंतर मराठवाडा मुक्तिसंग्राम दिना विषयी शाळेतील विद्यार्थीनी कु. श्रेया कदम हिने विचार मांडले. तर इयत्ता नववीच्या विद्यार्थीनी कु. श्रेया कदम कु. अक्षरा साळुंके, कु. अक्षरा मस्के कु. प्रीती कांबळे यांनी देशभक्ती गीत सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले. त्या नंतर शेकापचे भाई आकाश निर्मळ आणि श्री गणेश आबा कदम यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना संस्थेचे सचिव श्री नामदेवराव वाघ सर यांनी म्हणाले की, मराठवाडा मुक्त करण्याच्या या लढ्यामागे क्रांतीकारकाच्या मनात एक मोठी प्रेरणा होती. या प्रेरणेतून त्यांच्या अंगी र्धैर्य,शौर्य निर्माण झाले. या ध्येयनिष्ठेने त्यांनी निजामाच्या जुलमाच्या श्रृखंला तोडल्या. या कार्यात गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी खंबीर भूमिका घेतली होती. खंबीर व पोलादी मन असणाऱ्या महापुरुषांचा, आदर्श देशभक्तांचा त्यांनी केलेले कार्य आणि त्यांनी दाखवलेला मार्ग आज प्रत्येकांनी आपल्या जीवन अंगिकारून उज्ज्वल जीवन जगावे असे आवाहन श्री नामदेवराव वाघ यांनी यावेळी विद्यार्थ्यांना केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री वाव्हळ सर यांनी तर आभार श्री चव्हाण सर यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीमती फाटे मॅडम, श्रीमती साळुंके मॅडम श्रीमती सानप मॅडम श्री गणेश गुजर यांच्या सह शिक्षकेत्तर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

  • सामाजिक कार्यकर्ते भाई आकाश निर्मळ यांच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार!
  • शालांत प्रमाणपत्र परीक्षा मार्च 2025 मध्ये श्री महालक्ष्मी माध्यमिक विद्यालयातून प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या कु. अनुष्का धुमाळ, द्वितीय क्रमांक मिळवणारा प्रथमेश काकडे, तृतीय क्रमांक मिळवलेल्या चिरंजीव शरद शेंडगे आणि चौथा क्रमांक मिळालेल्या कु. सपना शिंदे या विद्यार्थ्यांना शिदोड चे भूमिपुत्र तथा सध्या रायगड येथे स्थायिक झालेले सामाजिक कार्यकर्ते श्री आकाश भाई निर्मळ यांच्यावतीने स्मृतिचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सर्वांना या गुणवंत विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या.

________________________________

Check Also

संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सर “प्रेरणा पुरस्काराने सन्मानित

त्याग, संघर्ष आणि प्रेरणादायी संघर्षाचा दीपस्तंभ उजळला ! संघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे सर “प्रेरणा पुरस्काराने …