17/04/26

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत साहेबांचा लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत साहेबांचा लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने सत्कार

बीड दि.१९(प्रतिनिधी)- बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष इंटेलिजन्स डॅशिंग आणि सिंघम पोलीस अधिकारी म्हणून ओळखले जाणारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नवनीतजी कॉवत साहेबांचा आज दिनांक 19 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने त्यांचा सत्कार करून त्यांना निरोगी व दीर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
बीड जिल्ह्यामध्ये मागील काही दिवसापासून गुन्हेगारी पार्श्वभूमी जास्त प्रमाणात वाढली होती. या गुन्हेगारीवर अंकुश आणण्यासाठी खास नियुक्ती झालेले शांत, संयमी आणि सदैव हसमुख असणारे बीड जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष इंटेलिजन्स डॅशिंग आणि सिंघम अशी
आपल्या कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारे बीड जिल्हा पोलीस अधीक्षक मा. श्री. नवनीतजी कॉवत साहेबांचा आज 19 सप्टेंबर रोजी वाढदिवस आहे. कॉवत साहेबांचा वाढदिवस म्हणजे हा सर्वसामान्यांचा सण उत्सव निर्माण झाला आहे. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने बीड शहरातील विविध राजकीय पदाधिकारी, नेते, कार्यकर्ते यांच्यासह पत्रकार आणि सामान्य नागरिकांनीही मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला आहे. आज शुक्रवार रोजी सकाळपासून नवनीत कॉवत साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दर्दी लोकांनी मोठी गर्दी केली होती. त्याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून लोकशाही पत्रकार संघाच्या वतीने प्रदेशचे जेष्ठ मार्गदर्शक तथा अखिल भारतीय वाल्मिकी समाजाचे श्री विजेंद्र भाई डुलगच, संघाचे संस्थापक अध्यक्ष भागवत वैद्य सर, मराठवाडा अध्यक्ष संपादक श्री आत्माराम वाव्हळ सर यांच्यासह बीड जिल्हा संघटक श्री संजय देवा कुलकर्णी कुक्कडगावकर यांनी भेट घेऊन नवनीत कॉवत साहेबांचा यथोचित सत्कार करून त्यांच्या भावी, निरोगी, दीर्घायुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलीस अधीक्षक श्री नवनीत कॉवत साहेब यांनी पत्रकार संघाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त करत. लोकशाही पत्रकार संघाच्या पत्रकारांना अडी अडचणी आल्यास मदत करण्याचे आश्वासन दिले.
________________________________

Check Also

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप रतनाताई पांचाळ महाराज

ज्या घरात भक्ती, संस्कृती आणि माणुसकी जपली जाते, ते घर समाजाला सुसंस्कृत पिढी देऊ शकते-हभप …