14/03/26

गेवराईतील नागरी समस्यांकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांतून तीव्र संताप

 गेवराईतील नागरी समस्यांकडे नगर पालिकेचे दुर्लक्ष; नागरिकांतून तीव्र संताप

गेवराई दि.२०(सुभाष मुळे): शहरात गेल्या काही दिवसांपासून विविध नागरी समस्या उग्र बनल्या आहेत. परंतु नगर परिषदेच्या प्रशासनाकडून या समस्यांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. गेवराई पोलिस ठाण्यासमोरील कचरा, मातीची ढिगारे, शहरातील रस्त्यावरील खड्डे, नाल्यांची दुरावस्था, अपुऱ्या प्रकाशाची व्यवस्था, कचऱ्याचे साम्राज्य, पाण्याचा असमान पुरवठा यामुळे नागरिक त्रस्त झाले असून नागरिकांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
गेवराई नगरातील नागरिक सांगतात की, “प्रत्येक समस्येसाठी वारंवार नगर परिषदेत जाऊन तक्रार करावी लागते, तेव्हाच थोडीफार दखल घेतली जाते. प्रशासनाकडून स्वयंस्फूर्तीने कामे करण्याची तयारी दिसून येत नाही.” त्यामुळे लोकांमध्ये नाराजी वाढली आहे. विशेषतः पोलिस स्टेशन परीसर, कुरेशी मुहल्ला, राज गल्ली, मुख्य बाजारपेठ, जुना मोंढा परीसर, कोरबु गल्ली, नवनगर भाग, मेन रोड या ठिकाणी खड्ड्यांनी तसेच निकामी बांधकाम मटेरीयल, माती महीनो महीने पडून अक्षरशः रस्त्यांवरच ढिगारे निर्माण झाले आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. त्याचप्रमाणे शहरातील अनेक भागांमध्ये पार्किंगची शिस्त राहीली नाही, आणि मोंढा चौकात भर रस्त्यावरच भाजी विक्रेत्यांच्या हातगाड्या लागत असल्याने रहदारीस मोठा अडसर होऊ लागला आहे. रात्रीच्या वेळी अंधारकोपऱ्यात गुन्हेगारीच्या घटना घडत असल्याने नागरिक भयभीत आहेत. सार्वजनिक शौचालये, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा या सर्वच मूलभूत सेवांमध्ये त्रुटी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक सामाजिक संघटनांनी नगर परिषदेवर टीका करताना म्हटले की, “शहराचा कर नियमितपणे वसूल केला जातो, मात्र त्या बदल्यात सुविधा मिळत नाहीत. प्रशासनाचे लक्ष केवळ महसूल वसुलीवर असून नागरिकांच्या अडचणींकडे दुर्लक्ष केले जात आहे.” याबाबत जबाबदार अधिकाऱ्यांकडून मात्र कोणतेही ठोस पावलं उचलली जात नाही, जर उचललीच तर राजकारण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले जाते. नगर परिषदेने तात्काळ नागरी समस्यांकडे लक्ष देऊन त्यांचे निराकरण करावे, अन्यथा राजकारणी लोकांना व अधिकारी यांना रोषाला सामोरे जावे लागेल यात तीळमात्र शंका नाही.

***

Check Also

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील …