14/03/26

कपिलधारवाडी संकटातून बाहेर पडेना; कपिलधार संस्थान तिजोरी उघडेना! कपिलधार संस्थानने दायित्व व दानत दाखवत तिजोरी उघडावी – सर्वसामान्यांची मागणी

कपिलधारवाडी संकटातून बाहेर पडेना; कपिलधार संस्थान तिजोरी उघडेना!
कपिलधार संस्थानने दायित्व व दानत दाखवत तिजोरी उघडावी – सर्वसामान्यांची मागणी
बीड दि. ७(प्रतिनिधी)-शेतकरी किती मोठा दाता आहे हे पाहायचं असेल, तर त्यांनी विविध देवस्थानांना सढळ हाताने दिलेली देणगी पाहावी. मात्र आज परिस्थिती उलटली आहे. शेतकऱ्यांवरच संकट कोसळले असून आता त्यांनाच मदतीसाठी हात पसरण्याची वेळ आली आहे. बीड जिल्ह्यातील कपिलधारवाडी या गावावर माळीण दुर्घटनेसारखं भीषण संकट आलं आहे. या घटनेची दखल मुंबईतून आलेल्या अभिनेत्यांपासून ते सामाजिक संघटनांपर्यंत सर्वांनी घेतली; मात्र अगदी शेजारी असलेल्या कपिलधार देवस्थान समितीला मात्र हे दु:ख दिसले नाही, ही बाब खेदजनक आहे.
मन्मथस्वामी मंदिर स्थापनेपासून कपिलधारवाडीतील ग्रामस्थांनी सदैव सढळ हाताने देवस्थानला मदत केली. पण आज तेच लोक रस्त्यावर झोपायच्या स्थितीत आले आहेत. अशा वेळी धान्य, कपडे, वैद्यकीय मदत, निवारा अशा कोणत्याही स्वरूपात सहाय्य करणे हे देवस्थानचे सामाजिक व नैतिक दायित्व आहे.
कपिलधार देवस्थानाकडे सरकारकडून कोट्यवधींचा निधी उपलब्ध असून दरवर्षी भक्तांकडून लाखो रुपयांचे दान प्राप्त होते. तरीसुद्धा त्या निधीचा लोककल्याणासाठी एकही उपक्रम दिसत नाही. मराठवाड्यातील इतर अनेक संस्थानांनी अतिवृष्टीग्रस्तांसाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत केली, पण कपिलधार संस्थान मात्र मौन बाळगून आहे.
जवळच्याच कपिलधारवाडीवर संकट असताना, कपिलधार संस्थानने पुढाकार घेऊन दानत दाखवावी, तिजोरी उघडावी आणि संकटग्रस्तांना मदतीचा हात द्यावा, अशी जनतेची तीव्र मागणी होत आहे.

Check Also

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील पत्रकारितेला सलाम; संपादक श्री आत्माराम वाव्हळ यांना ‘लोकरत्न पुरस्कार’ प्रदान श्री आत्माराम वाव्हळ यांच्यावर सर्व स्तरातून होतोय अभिनंदनाचा वर्षाव!

संघर्ष यात्राच्या शिरपेचात मानाचा तुरा!  श्री आत्माराम वाव्हळ यांच्या शिक्षण व पत्रकारितेतील योगदानाची दखल संघर्षशील …