17/12/25

बीड मध्ये’हरे कृष्ण’ च्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा!

बीड मध्ये’हरे कृष्ण’ च्या गजरात श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव उत्साहात साजरा!

बीड दि.२६ (प्रतिनिधी) :
आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ यांच्यातर्फे बीड शहरातील सावतामाळी चौकातील श्री राधा गोविंद मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव हजारो भाविकांच्या सानिध्यात मोठ्या साजरा करण्यात आला.
यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत! अभ्यथानमधर्मस्य तदात्मानं सृजन्यम!!
जेव्हा जेव्हा आणि जेथे जेथे धर्मा चरणाचा ऱ्हास होतो व अधर्माचे वर्चस्व होते त्यावेळी हे भारता मी स्वतः अवतरीत होतो असे प्रतिपादन भगवान श्रीकृष्ण भगवदगीतेमध्ये करतात.सुमारे 5251 वर्षापूर्वी मथुरेच्या कारागृहामध्ये देवकीच्या उदरी भगवान श्रीकृष्णांनी चतुर्भुज रूपामध्ये शंख चक्र गदा पद्म धारण करून अवतार घेतला. स्वतः भगवान श्रीकृष्ण यांच्या लीला वृंदावन लीला, मथुरालीला व द्वारका लीला या तीन भागांमध्ये प्रसिद्ध आहेत. त्यापैकी भगवान श्रीकृष्णांच्या बाल लीला सर्वात मधुर आणि सर्वांना प्रेरणा देणाऱ्या तसेच सर्व मानव जातीला शिकवण देणाऱ्या आहेत. या लीलांचे जो व्यक्ती श्रवण करतो गायन करतो व इतरांना सांगतो, त्या व्यक्तीचा या भौतिक जगातून उद्धार होतो असे प्रतिपादन श्रीमान भगवान प्रभू यांनी श्रीकृष्ण लीले मध्ये केले.
पहाटे साडेचार वाजता काकडा आरती, शृंगार दर्शन ,त्यानंतर कृष्णलीला व सायंकाळी चार वाजल्यापासून भजन कीर्तन श्री श्री राधा गोविंद यांचा सहस्त्र जलधारा व पंचामृत अभिषेक, इस्कॉन युवा भक्त वृंदांकडून आध्यात्मिक नाटिका व रात्रौ बारा वाजत श्री श्री राधागोविंद यांचे विशेष दर्शन हजारोंच्या संख्येने भाविक भक्तांनी घेतले.
16 ऑगस्ट ते 27 ऑगस्ट 2024 पर्यंत चालणाऱ्या श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव या उत्सवामध्ये परम आदरणीय गोपती प्रभू इस्कॉन निगडीचे अध्यक्ष व परम आदरणीय भगवान प्रभू यांनी आपल्या श्राव्य श्राव्यवाणीमध्ये श्रीकृष्ण कथा झाली. या कार्यक्रमासाठी विठ्ठल आनंद प्रभू अध्यक्ष श्री श्री राधा गोविंद मंदिर, यादवेंद्र प्रभू कृष्णनाम प्रभू आणि श्री श्री राधा गोविंद भक्तसमाज यांनी विशेष मेहनत घेतल्याची माहिती इस्कॉन बीड चे प्रतिनिधी श्रीमान कृष्णनामदास यांनी दिली.

Check Also

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी केले स्वागत

शिक्षणमंत्र्यांच्या आदेशाने एकल महिलांच्या मुलांना शैक्षणिक मदतीचा मार्ग मोकळा शिक्षणमंत्र्यांचा संवेदनशील निर्णयाचे बाजीराव ढाकणे यांनी …