13/06/26

अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!

अतिवृष्टीमुळे उद्या मंगळवार रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर!

बीड दि.१५ (प्रतिनिधी)-जिल्ह्यातील पूरस्थिती आणि मुसळधार पडणारा पाऊस या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यायांना उद्या मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांना सुट्टीतून वगळण्यात आले असल्याचे या संदर्भात काढण्यात आलेल्या पत्रात म्हटले आहे.
महाराष्ट्रात सह बीड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसापासून राज्यातील बहुतांश भागात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. यामध्ये मराठवाड्यासह बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात मुसळधार पाऊस कोसळत आहे. या पावसामुळे बीड जिल्ह्यातील 16 मध्यम आणि 126 लघु प्रकल्प ओसंडून वाहत असल्यामुळे शिरूर, पाटोदा, आष्टी, बीड, वडवणी, गेवराई, अंबाजोगाई, परळी या तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गोदावरी नदीपात्रामध्ये एक दिवसात लाखो लिटर पेक्षा अधिक पाणी विसर्ग करण्यात येत आहे. तसेच वडवणीच्या उर्ध्वकुंडलिका, माजलगाव, मांजरा या धरणातून देखील हजारो क्युसेस पाणी नदीपात्रात सोडण्यात येत असल्यामुळे अनेक गावात पूरस्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी तातडीची पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील पूर परिस्थिती विषयी माहिती दिली. आष्टी तालुक्यातील 52 लोकांना रेस्क्यू ऑपरेशनच्या माध्यमातून सुखरूपपणे सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व परिस्थितीवर प्रशासन अतिशय बारकाईने लक्ष ठेवून आहे. जिल्ह्यातील पूरस्थिती आणि पडणारा पाऊस या अनुषंगाने बीड जिल्ह्यातील सर्व शाळांना व महाविद्यायांना उद्या मंगळवार दिनांक 16 सप्टेंबर 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मात्र 17 सप्टेंबर 2025 रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असल्याने त्याच्या पूर्वतयारीसाठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना सुट्टीतून वगळण्यात आले असल्याचे पत्रात म्हटले आहे.
________________________________

Check Also

बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला

​बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर …