28/07/26

आझाद मैदानात दिलेल्या आश्वासना संदर्भात लवकरच बैठक – शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ग्वाही शिक्षकदूत मंगेश चिवटे यांचा पाठपुरावा सुरूच…

आझाद मैदानात दिलेल्या आश्वासना संदर्भात लवकरच बैठक – शिक्षण मंत्री दादा भुसे यांची ग्वाही

शिक्षकदूत मंगेश चिवटे यांचा पाठपुरावा सुरूच…

मुंबई दि.२८(प्रतिनिधी)-मुंबईतील आझाद मैदानावर पार पडलेल्या शिक्षकांच्या आंदोलनानंतर केलेल्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. ‘शिक्षकदूत’ मंगेश चिवटे यांनी मंगळवारी शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे यांची भेट घेऊन शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर केले. आझाद मैदानावरील आंदोलनादरम्यान देण्यात आलेल्या आश्वासनानुसार शिक्षकांच्या प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित केली जाईल, अशी ग्वाही शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी या वेळी दिली.
जुलै महिन्यात आझाद मैदानावर झालेल्या आंदोलना दरम्यान शिक्षकांच्या विविध प्रश्नांवर महिन्याभरात बैठक घेण्याचे आश्वासन देण्यात आले होते. या आश्वासनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी व्हावी, यासाठी मंगेश चिवटे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या पाठपुराव्याची दखल घेत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी या निवेदनावर स्वाक्षरी करून तात्काळ बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्देशानंतर हे निवेदन शिक्षण मंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आल्याने या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या भेटीदरम्यान मंगेश चिवटे यांनी पुणे येथे क्रीडा शिक्षकांच्या सुरू असलेल्या आंदोलनाकडेही शिक्षणमंत्र्यांचे लक्ष वेधले. क्रीडा शिक्षकांच्या न्याय्य मागण्या तात्काळ मान्य करून त्यांना दिलासा द्यावा, अशी आग्रही विनंती त्यांनी निवेदनाद्वारे केली. या सर्व मुद्द्यांवर सकारात्मक प्रतिसाद देत शिक्षणमंत्री दादा भुसे साहेब म्हणाले, “शिक्षकांवर किंवा क्रीडा शिक्षकांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय होऊ दिला जाणार नाही. आझाद मैदानात दिलेल्या आश्वासना नुसार सर्व प्रलंबित प्रश्नांवर लवकरच बैठक घेऊन मार्ग काढला जाईल. निवेदन सादर करताना शालेय शिक्षणमंत्री दादाजी भुसे साहेब, मंत्री गुलाबराव पाटील साहेब, श्री तुकडोजी महाराज राहते साहेब, शिक्षकदूत मंगेश चिवटे आणि सोलापूर शिवसेना जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
बीड

Check Also

जनगणना कर्तव्यावरील शिक्षकांना विमा संरक्षण व ५० लाखांची मदत द्या विना अनुदानित शाळा कृती समितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

जनगणना कर्तव्यावरील शिक्षकांना विमा संरक्षण व ५० लाखांची मदत द्या विना अनुदानित शाळा कृती समितीची …