17/07/25

शिक्षक समन्वय संघाचा सलग दुसऱ्या दिवशी पाठपुरावा सुरूच…! 18 जुलै रोजी विधीमंडळात होणाऱ्या घोषणेकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष

शिक्षक समन्वय संघाचा सलग दुसऱ्या दिवशी पाठपुरावा सुरूच…!

18 जुलै रोजी विधीमंडळात होणाऱ्या
घोषणेकडे राज्यातील शिक्षकांचे लक्ष

मुंबई दि.16(प्रतिनिधी)-
महाराष्ट्र राज्यातील अघोषित शाळा आणि अंशतः अनुदानित शाळा व त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 14 ऑक्टोबर रोजी झालेल्या शासन निर्णयानुसार अनुदान मिळावे म्हणून आझाद मैदानावर आंदोलन झाले होते. यावेळी सरकारच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याच अधिवेशन मध्ये टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीची तरतूद करणार असे आश्वासन दिले. त्या आश्वासनाची पूर्तता करावी म्हणून शिक्षक समन्वय संघाच्या पदाधिकाऱ्यांनी सलग दुसऱ्या दिवशी पाठपुरावा सुरूच ठेवला. बुधवार दिनांक 16 रोजी विधानभवनात कोकण विभागाचे शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे साहेब यांच्या नेतृत्वात दिवसभर पाठपुरावा केला.
सभागृह सुरू होताच राज्यातील सर्व शिक्षक व पदवीधर आमदारांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांची भेट घेऊन त्यांना आझाद मैदानावरील आंदोलकांचे शिष्टमंडळ व आमदार महोदया मध्ये झालेल्या 9 जुलै च्या बैठकीतील आश्वासनाची आठवण करून दिली असता आज पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या गुरुवार 18 जुलै रोजी दि. 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयातील पदांना 2025 पासून वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या निधीची घोषणा विधिमंडळात करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. आजच्या विधिमंडळातील कामकाजाकडे सर्व शिक्षकांचे लक्ष लागले आहे
शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळांनी
मागील दोन दिवसापासून टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीच्या तरतूदीसाठी पाठ प्रवास सुरू केला. मंगळवार दिनांक 15 जुलै रोजी सर्व शिक्षक आमदारां सोबत घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन निधी तरतुदीच्या संदर्भात चर्चा केली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आपला प्रश्न मार्गी लावणार आहोत 18 जुलै रोजी यासंदर्भात विधिमंडळात घोषणा केली जाईल असे आश्वासन दिले होते. त्यानंतर आज बुधवार दिनांक 16 रोजी पुन्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली.
यावेळी पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवार दिनांक 18 जुलै रोजी 14 ऑक्टोंबर 2024 च्या शासन निर्णयातील पदांना 2025 पासून वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या निधीची घोषणा विधिमंडळात करण्यात येईल असे आश्वासन दिले आहे. सलग दुसऱ्या दिवशीही मुख्यमंत्र्यांनी आवर्जून निधी तरतुदी संदर्भात ची घोषणा केली जाणार असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे निश्चितता टप्पा वाढीसाठी लागणाऱ्या निधीच्या तरतूदीचा प्रश्न मार्गी लागण्याच्या उंबरठ्यावर येऊन ठेपला आहे. आता राज्यातील सर्व शिक्षकांचे लक्ष दिनांक 18 जुलै रोजी विधिमंडळात होणाऱ्या निधीच्या घोषण कडे लक्ष लागले आहे. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर शिक्षक समन्वय संघाच्या शिष्टमंडळाने राज्याचे शालेय शिक्षण राज्यमंत्री ना. पंकज भोयर साहेब यांची भेट घेऊन त्यांना दि. ८ व ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलन झाले होते त्या संदर्भात राज्याचे शिक्षण संचालक यांनी दोन दिवस वेतन कपातीचे आदेश काढले होते. यासंदर्भात राज्यातील शिक्षकांना क्षमापती देऊन दोन दिवसाचे वेतन कापू नये या संदर्भात विनंती केली असता, यासंदर्भात तातडीने संचालकांना आदेशित करण्यात येऊन निर्णय घेण्यात येईल असे या वेळी सांगितले. आजच्या शिष्टमंडळात खंडेराव जगदाळे, पुंडलिक रहाटे,संजय डावरे, सदानंद लोखंडे, वैजिनाथ चाटे,अजय थूल हे उपस्थित होते.
_______________________________

Check Also

*चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी* *चीनमधून बेदाण्यांच्या बेकायदा आयातीमुळे देशातील शेतकरी, राष्ट्रीय महसुलाचे नुकसान– उपमुख्यमंत्री अजित पवार*

*चीनमधून होणारी बेदाण्यांची बेकायदा आयात थांबवण्यासाठी* *उपमुख्यमंत्री अजित पवार यांची केंद्र सरकारकडे पत्राद्वारे मागणी* *चीनमधून …