21/06/25
Oplus_0

शैक्षणिक क्षेत्रात तृप्ती कोठारी-बंब ठरल्या ‘आयकॉन’ उत्कृष्ट कार्याबद्दल इंटरनॅशनल आयकॉन आवार्डने गौरव, कोठारी ड्रीम स्कूलने सक्षम पर्याय दिला-जिल्हाधिकारी

शैक्षणिक क्षेत्रात तृप्ती कोठारी-बंब ठरल्या ‘आयकॉन’
उत्कृष्ट कार्याबद्दल इंटरनॅशनल आयकॉन आवार्डने गौरव,
कोठारी ड्रीम स्कूलने सक्षम पर्याय दिला-जिल्हाधिकारी

बीड, दि.19 (प्रतिनिधी) ः- जालना शहरातील नामांकित कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कुलच्या संचालिका तथा दैनिक लोकाशाचे संपादक विजयराज बंब यांच्या कन्या तृप्ती प्रसन्ना कोठारी-बंब यांनी शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या उत्कृष्ट कार्याची दखल घेत आंतरराष्ट्रीय स्तरावरील kiteskraft productions llp, globle chamber of consumer rights  या संस्थेने त्यांना इंटरनॅशनल आयकॉन आवार्ड 2024 ने सन्मानित केले आहे. भारताचे माजी केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन राज्यमंत्री श्री. जोसेफ, न्यायाधीश अमरेश्‍वर प्रताप साही, क्रिकेटर चेतन शर्मा यांच्यासह इतर प्रमुख मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, हा आवार्ड मिळाल्याबद्दल दि.19 जुलै रोजी जिल्हाधिकारी श्रीकृष्णा पांचाल यांच्या हस्ते तृप्ती कोठारी यांचा गौरव करण्यात आला. कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कुलने जालनाकरांना शैक्षणिक क्षेत्रातील एक उत्कृष्ट सक्षम पर्याय दिला असल्याचे उद्गार यावेळी जिल्हाधिकारी श्रीकृष्णा पांचाल यांनी काढले.
जालना शहरात तृप्ती कोठारी यांनी कोठारी इंटरनॅशनल ड्रीम स्कुलची उभारणी करून दर्जेदार शिक्षण दिले आहे. त्यांच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे जालनाकरांना सीबीएससी पॅटर्नचा एक सक्षम पर्याय उपलब्ध झाला आहे. या स्कुलमध्ये मिळत असलेले गुणवत्तापूर्ण शिक्षणामुळे पालकांचा ओढा या स्कुल प्रवेश घेण्याकडे आहे. संचालिका तृप्ती कोठारी यांनी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाबरोबरच कलागुणांना वाव देण्यासाठी प्रयत्न केलेले आहेत. मागील काही दिवसांत अनेक गुणवत्तापूर्ण विद्यार्थी घडविण्याचे काम तृप्ती यांनी केले असून यांच्या या कार्याची दखल आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांनी घेतली आहे. त्यांना 2024 चा इंटरनॅशनल आयकॉन आवार्ड प्रदान करण्यात आला आहे. दरम्यान, हा आवार्ड मिळाल्याबद्दल जिल्हाधिकारी  श्रीकृष्णा पांचाल यांच्या हस्ते तृप्ती कोठारी यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उपजिल्हाधिकारी रिता मैत्रेवार, कोठारी ड्रीम स्कूलचे अध्यक्ष विनयकुमारजी कोठारी, लोकाशा दैनिकाचे संपादक तथा समाजरत्न विजयराजजी बंब, भारतीय जैन संघटना जिल्हा अध्यक्ष दिनेशजी राका, विवेकानंद हॉस्पिटलचे डॉक्टर सचदेव, एमबी ग्रुपचे अल्केश कुमार, रोटरी डिस्ट्रिक्टचे प्रांतपाल डॉक्टर सुरेशजी साबू, कोठारी ड्रीम स्कूलचे सेक्रेटरी प्रसन्नाजी कोठारी, सौ.अपूर्वा जैन आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, हा पूरस्कार मिळाल्याबद्दल तृप्ती कोठारी-बंब यांचे सर्वस्तरातून अभिनंदन, कौतूक होत आहे.

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …