आष्टी पाटोदा मतदारसंघातून मेहबूब शेख यांना संधी द्यावी:-किरण डावकर, संतोष पवार
बीड दि.२९( प्रतिनिधी):- येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये शरद पवार साहेब यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत असणारे व गोरगरिबाच्या अडचणीसाठी अहोरात्र झटणारे मेहबूब भाई शेख यांना उमेदवारी देऊन निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी द्यावी जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून गोरगरीब जनतेची सेवा करत असताना आष्टी पाटोदा मतदारसंघात विकास करण्यासाठी बळ मिळेल आष्टी पाटोदा मतदारसंघाचा इतिहास पाहता सोन्याचा चमचा घेऊन जन्माला येणारच आमदार होतो आणि विकास मात्र कागदावर राहतो त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीमध्ये तळागाळामध्ये काम करणाऱ्या व एकनिष्ठ असणाऱ्या गोरगरिबांच्या मदतीला अहोरात्र धावून जाणाऱ्या व ग्राउंड लेव्हल वरती जनसामान्यांमध्ये काम करणाऱ्या जनतेच्या मनातील भावी आमदार अशी ओळख असणाऱ्या मेहबूब भाई शेख यांना उमेदवारी देऊन येणाऱ्या काळामध्ये आष्टी पाटोदा मतदार संघामध्ये विकास करण्यासाठी आपल्या पक्षाच्या माध्यमातून यांना संधी द्यावी व आजपर्यंत घराणेशाहीचे राजकारण व तडजोडीचे राजकारण चाललं आहे याला कुठेतरी आळा बसवण्यासाठी आणि गुंडागर्दी थांबवण्यासाठी गोरगरिबाची जाण असणारा उमेदवार निवडून येणे हे काळाची गरज आहे आणि असे सर्वगुणसंपन्न असणारे हुशार व्यक्तिमत्व म्हणून परिचित आहेत यामुळें शरद पवार साहेब आणि जयंत पाटील साहेब यांनी मेहबूब भाई शेख यांना संधी द्यावी आम्ही सर्व कार्यकर्ते अहोरात्र प्रयत्न करून गावागावात तांडे वस्तीवर जाऊन मेहबूब भाई सारख्या निष्ठावंतांना विधानसभेत पाठवण्यासाठी प्रयत्न करू आणि यशाला गवसणी घालू असं मत सामाजिक कार्यकर्ता किरण डावकर व राष्ट्रवादी पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते संतोष दादा पवार यांनी व्यक्त केला आहे