21/06/25
oplus_0

राज्यातील शिक्षक वेठबिगारा प्रमाणे काम करतात हे शासनाचे अपयश- डॉ. संजय तांदळे सेवानिवृत्त ईपीएस 95 संघटनेचा शिक्षकांच्या टप्पा वाढ आंदोलनास पाठिंबा

राज्यातील शिक्षक वेठबिगारा प्रमाणे काम करतात हे शासनाचे अपयश-
डॉ. संजय तांदळे

सेवानिवृत्त ईपीएस 95 संघटनेचा शिक्षकांच्या टप्पा वाढ आंदोलनास पाठिंबा

बीड दि.२९(प्रतिनिधी) -पुरोगामी महाराष्ट्रामध्ये राज्यातील हजारो शिक्षक विनाअनुदानित विनावेतन तर काही शिक्षक अंशतः अनुदानित तत्त्वावर काम करत आहेत. शिक्षकावर वेठबिगारा प्रमाणे काम करण्याची वेळ येणे हे शासनाचे मोठं अपयश आहे. हा शिक्षण क्षेत्राला लागलेला कलंक आहे हा कलंक धुवून काढण्यासाठी शासनाने तातडीने अंशतः अनुदानित शाळांना प्रचलित नियमाप्रमाणे अनुदान द्यावे यासाठी सुरू असलेल्या आंदोलनाची दखल घेऊन तातडीने टप्पा वाढ द्यावी यासाठी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉ. संजय तांदळे यांनी बीड मधील आंदोलनकर्त्या शिक्षकांचा पाठिंबा देताना केली.
महाराष्ट्रामध्ये प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालयातील शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान मिळावे या मागणीसाठी संपूर्ण राज्यात साखळी धरणे या आंदोलनासह विविध आंदोलने सुरू आहेत. बीड जिल्ह्यात शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर शिक्षकांच्या सुरू असलेल्या धरणे आंदोलनास बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे जिल्हाध्यक्ष तसेच सेवानिवृत्त ईपीएस 95 समन्वय समिती नवी दिल्लीच्या वतीने बीडचे अध्यक्ष तथा विभागीय संघटक डॉ. संजय तांदळे यांनी आंदोलनात सहभागी होऊन जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.
ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणाऱ्या शिक्षकांना विनावेतन व वेठबिगारी काम करून घेऊन रस्त्यावरून आंदोलन करायची वेळ येते हे शासनाचे अपयश आहे. शासनाने प्रश्नांची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ प्रचलित नियमानुसार टप्पा वाढ अनुदान द्यावे अशी मागणी बीड जिल्हा सामाजिक कार्यकर्ता संघटनेचे जिल्हाध्यक्ष तथा सेवानिवृत्त ईपीएस 95 समन्वय समिती बीड जिल्हा अध्यक्ष विभागीय संघटक डॉ. संजय तांदळे यांनी केले आहे. यावेळी आंदोलनस्थळी शिक्षक नेते डि.जी. तांदळे सर, मराठवाडा शिक्षक संघाचे जिल्हा सचिव गणेश आजबे सर, सुदाम कोळेकर, भाऊसाहेब फुंदे, दत्तात्रय चव्हाण सर, दिपक वडमारे सर, आत्माराम वाव्हळ सर,अविनाश काजळे सर, गणेश गुजर, कांता मात्रे, गंदगे सर, खुरणे सर, हनुमान बडे सर, प्रकाश जाधव सर, बडे सर वरिष्ठ शिंदे आदी उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …