21/06/25

मुख्यमंत्री साहेब,आपणास शिक्षक व शिक्षण लाडके नाहीत काय ? प्रा.ईश्वर मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुख्यमंत्री साहेब,आपणास शिक्षक व शिक्षण लाडके नाहीत काय ?

प्रा.ईश्वर मुंडे यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

बीड दि.३१( प्रतिनिधी )-
लोकसभेला मतदारांनी आसमान दाखवल्यावर आता महाराष्ट्रात विधान सभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून कोणाची मागणी नसतांना ही विद्यमान सरकार मतदारांना भुलवण्यासाठी रोज एक नवीन योजना घोषीत करत आहे. लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके वारकरी या सह अन्नपुर्णा अशा योजनांचा पूर येत आहे. या योजनांच्या जाहीरातीसाठी शेकडो करोडोंचा चुराडा व शासकीय कर्मचारी यांचा वापर केला जात आहे. परंतु शिक्षण,आरोग्य या नागरिकांच्या मुलभूत अधिकारांकडे दुर्लक्ष केले जात आहे. महाराष्ट्रात ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे हजारो शिक्षक अनेक वर्षे वेतना पासून वंचित आहेत. ज्यांना वेतन आहे ते टप्पा वाढीच्या खिंडीत अडकून तुटपुंज्या वेतनावर काम करत आहेत. अनेक शाळेत शिक्षक व शिक्षकेतर पदे रिक्त आहेत त्यांची भरती बंद आहे. या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष करणाऱ्या मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांना आपणास शिक्षण व शिक्षक लाडके नाहीत काय ? असा सवाल प्रा. ईश्वर मुंडे, राज्य प्रमुख,सेवा निवृत्त अधिकारी कर्मचारी सेल,राष्ट्रवादी कॅांग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष यांनी केला आहे.
या सरकारला विद्यार्थी लाडके नाहीत काय? असा सवाल ही मा.उच्च न्यायालय,मुंबई यांनी शिक्षक रिक्त पदे भरती याचीकेच्या सुनावणी दरम्यान विचारला होता.
बीड येथे विविध शैक्षणिक मागण्यांसाठी विविध शिक्षक व ईतर संघटनाचे चक्री आंदोलन सुरू आहे या आंदोलनास भेट देवून प्रा.ईश्वर मुंडे बोलत होते.
या वेळी शिक्षक संघटनेचे डी.जी.तांदळे, राजेश्वर कदम, दत्तात्रय चव्हाण, दिपक वडमारे, आत्माराम वाव्हळ, सतीश सोनवणे, अविनाश काजळे, गणेश गुजर, संभाजी इंगोले, हनुमान बडे, वशिष्ठ शिंदे, सचिन यादव, बाबाराम थोरात, तानाजी मोरे, नरेंद्र गंदगे, सचिन खुरणे तसेच अंशत: अनुदानित, विना अनुदानित शिक्षक -शिक्षिका बहुसंख्येने उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …