21/06/25

वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी

वडवणी येथील छत्रपती राजर्षी शाहू विद्यालयात साठे जयंती व टिळक पुण्यतिथी साजरी

वडवणी दि.01(प्रतिनिधी)- येथील छत्रपती राजर्षी शाहू महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात लोकशाहीर साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांची जयंती व लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक सानप सर तर प्रमुख पाहुणे म्हणून बार्टी चे तुरे सर, प्रा. साळवे सर, सौ. शेळके मॅडम हे होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले. त्यानंतर स्वागत गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या दोन्ही महापुरुषांचा जीवन परिचय व त्यांच्या कार्यावर निवडक विद्यार्थी व विद्यार्थिनींनी आपल्या वक्तृत्वातून प्रकाश टाकला. यानंतर प्रमुख पाहुणे तुरे सरांनी विद्यार्थ्यांना दोन्ही महापुरुषांचे कार्य सांगुन विविध शिष्यवृत्ती योजना याविषयी मार्गदर्शन केले. प्रा. साळवे सरांनी अण्णा भाऊ साठे यांनी लेखणीच्या सहाय्याने दीन दलित व उपेक्षित वर्गावर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम केले. त्यांचे विचार आपण आत्मसात केले पाहिजेत असे सांगितले. सौ. शेळके मॅडम यांनी दोन्ही महापुरुषांचे कार्य आपणा सर्वांना प्रेरणादायी आहे हे सांगुन लोकशाहीर “अण्णा भाऊ तुम्ही जन्म घ्या पुन्हा “या भावनिक व हृदयस्पर्शी गीतातून आपल्या भावना व्यक्त केल्या यावेळी क्षणभर उपस्थित सर्वांचे मन सुन्न झाले.शेवटी अध्यक्षीय भाषणामध्ये मु. अ. सानप सरांनी विद्यार्थ्यांना आपण अशा महापुरुषांची पुस्तके वाचून त्यांचे कार्य व विचार समजून घेऊन त्यांचा उपयोग आपल्या जीवनात केला पाहिजे असे सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती त्या स्पर्धेत मुलांमध्ये चि. जाधव दिपक (7वी) व मुलींमध्ये कु. जाधव लक्ष्मी(9वी) यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल मान्यवरांनी त्यांचा सत्कार केला. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख श्री. महानवर सर यांनी केले तर शेवटी प्रा. जाधव सर यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे ,सर्व विद्यार्थ्यांचे व विशेषतः कार्यक्रमासाठी सहकार्य करणारे सर्व शिक्षक-शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे आभार मानले.
________

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …