21/06/25

शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी खंडेराव जगदाळे यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची केली विनंती शिक्षण विभागातून आजच प्रस्तावाची फाईल अर्थ खात्यात जाणार! आज खंडेराव जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट; भेटीत ठोस निर्णयाची अपेक्षा राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष

शिक्षणमंत्री दिपक केसरकरांनी खंडेराव जगदाळे यांना फोन करून उपोषण मागे घेण्याची केली विनंती

शिक्षण विभागातून आजच प्रस्तावाची फाईल अर्थ खात्यात जाणार!

आज खंडेराव जगदाळे यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे घेणार भेट; भेटीत ठोस निर्णयाची अपेक्षा

राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे लागले लक्ष

कोल्हापूर दि.2 (प्रतिनिधी)-
सरकार आपल्या पाठीशी आहे, टप्पा वाढीचा प्रस्ताव कालच शिक्षण विभागाला प्राप्त झाला. तो उद्याच अर्थ खात्याकडे पाठवला जाणार आहे आणि येणाऱ्या कॅबिनेटला टप्पावाढी बाबत निर्णय घेण्यासाठी आम्ही प्रयत्नात आहोत, परंतु आपण उपोषण सोडावे जीवाला त्रास करून घेऊ नये असे राज्याचे शिक्षणमंत्री केसरकर यांनी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सरांना फोन द्वारे केले आहे. शिक्षणमंत्री यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत जगदाळे यांनी ज्यूस घेण्याचा निर्णय घेतला. ज्युस घेणार परंतु टप्पा वाढीचा जी आर निघणार नाही तोपर्यंत आपण अन्नत्याग करणार यावर जगदाळे सर ठाम आहेत. दरम्यान आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत.आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा उपोषण कर्ते खंडेराव जगदाळे यांची घेणार भेट घेणार आहेत.
या भेटीत ठोस निर्णय होण्याची खात्री वाटत आहे. राज्यातील हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे या भेटी कडे आणि भेटीत काय निर्णय होतो याकडे लक्ष लागले आहे.
महाराष्ट्रातील विनाअनुदानित शाळेत काम करणाऱ्या हजारो शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना न्याय मिळावा, विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित, शाळांना अनुदानाचा पुढील टप्पा मिळावा, तसेच प्रचलित नियमाप्रमाणे शंभर टक्के अनुदान द्या. या मुख्य मागणीसह इतर अन्य मागण्यासाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात विविध आंदोलन सुरू आहेत. राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यात विविध प्रकारचे आंदोलन करून देखील सरकार कसली ही प्रकारची कार्यवाही करत नसल्याने कोल्हापूरमध्ये महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष तथा सर्व विनाअनुदानित शाळेतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे दैवत महासंघर्ष योद्धा खंडेराव जगदाळे यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. आज उपोषणाचा आठवा दिवस आहे. काल उपोषणाच्या सातव्या दिवशी उपोषण कर्ते खंडेराव जगदाळे सर यांची शुगर लेवल आणि बीपी कमी झाल्याने प्रकृती अंत्यंत खालावली होती. त्यांची प्रकृती खालावल्याने प्रशासनाने त्यांना उपचार घेण्याची विनंती केली. मात्र खंडेराव जगदाळे यांनी उपचार घेण्यास नकार दिला. यावेळी अनेक विना अनुदानित शाळेतील शिक्षकांनी जगदाळे सरांना उपचार घेण्यासंदर्भा मध्ये विनंती केली. मात्र उपचार करण्यास किंवा उपोषण मागे घेण्यास खंडेराव जावळे सर यांनी नकार दिला. राज्यातील अनेक शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी आपले देव पाण्यात घातले. तरीही जगदाळे सर यांनी उपचार घेण्यास व उपोषण मागे घेण्यास नकार दिला. उपोषणाच्या सातव्या दिवशी जगदाळे सरांची
प्रकृती अंत्यंत खालावल्याचे समजताच राज्य सरकारने सकारात्मक पाऊल उचलण्यास सुरुवात केली. उपोषणाच्या सातव्या दिवशी म्हणजेच काल रविवार दिनांक १ सप्टेंबर २०२४ रोजी दुपारी ४:३० वाजण्याच्या सुमारास राज्याचे शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खंडेराव जगदाळे यांना
फोन करून भावनिक आवाहन केले, आणि सांगितले की, सरकार आपल्या पाठीशी आहे. प्रस्ताव कालच शिक्षण विभागाला प्राप्त झाला आहे तो उद्याच अर्थ खात्याकडे जाईल आणि येणाऱ्या कॅबिनेटमध्ये काम होईल आम्ही त्याच प्रयत्नात आहोत, पण आपण उपोषण सोडा, जीवाला त्रास करून घेऊ नका. शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या शब्दाचा मान ठेवून जगदाळे सरांनी ज्यूस घेण्याचा निर्णय घेतला. ज्युस घेणार पण अन्नत्याग चालूच राहील यावर जगदाळे सर यांनी ठाम असल्याचे सांगितले. आज सोमवार दिनांक 2 सप्टेंबर 2024 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूर दौऱ्यावर आहेत. खासदार धैर्यशील माने हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपोषण कर्ते खंडेराव जगदाळे सर यांची भेट घडवून आणणार आहेत. आजच्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या समवेत झालेल्या भेटीत निश्चितच ठोस तोडगा निघेल असा आशावाद विनाअनुदानित शाळेतील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आहे.
_______________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …