21/06/25

*मेंदू आणि मानवी जीवन*

*मेंदू आणि मानवी जीवन*

        मानव प्राणी पृथ्वीवर जन्माला आल्यापासून ते आजतागायतच्या प्रवासात मानवी मेंदूला अतिशय महत्व प्राप्त झालेले आहे. “मानवाचा विकास झाला म्हणून मेंदूचा विकास झाला. किंवा, मेंदूचा विकास झाला म्हणून मानवाचा विकास झाला?” या प्रश्नाचे उत्तर आज जगात कोणाकडेच नाही. परंतु मानवाच्या विकासात मानवी मेंदूच्या विकासाला मात्र अनन्यसाधारण महत्व प्राप्त झालेले आहे.
मित्रहो आपल्याला चांगले जीवन जगण्यासाठी आपल्या शरीराच्या सर्व अवयवांचे महत्व अवर्णनीय आहे. हृदय, फुप्फुसे, अन्ननलिका, लिवर, किडनी, अंतर्स्त्राव ग्रंथी हे अवयव अचूक काम करतात म्हणून आपण जिवंत राहतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का? शरीरातील वरील सर्व अवयवांना मेंदूच चालवत असतो. आपल्या हृदयाची धडधड, फुप्फुसांचे कंप, डोळ्याच्या बुबळाची हालचाल, शरीराच्या सर्व अवयवांची हालचाल मेंदूच नियंत्रित करीत असतो.
आपण चांगल्या आरोग्यासाठी चांगला सकस आहार, शरीर काटक बनविण्यासाठी व्यायाम करीत असतो. जर वजन वाढले तर वजन कमी करण्यासाठी धावणे, उडया मारणे, फॅट विरहित आहार असे सुरूच असते. परंतु हे सर्व शरीराच्या दिसणाऱ्या किंवा जाणवणाऱ्या भागावर आपण काम करीत असतो. पण मेंदूचे काय? आपल्या मानसिकतेचा परिणाम आपल्या मेंदूवर पडतो. विविध मानसिक अवस्थेतून आपल्या मेंदूतून स्त्रावणारी रसायने, या रसायनाचा शारीरिक व मानसिक आजार यावर पडणारे परिणाम याबाबत पूर्ण माहिती असली पाहिजे.
आपण आजारी पडलो की, डॉक्टर आपले रक्त, युरीन तपासतात. या रिपोर्टमध्ये काय असते हे कोणी पाहिलेले आहे का? आपल्या रक्तातील कोणती रसायने वाढली आणि कोणती रसायने कमी झाली हेच असते., आपल्या मानसिकतेमुळे मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीत बदल झाला की, पियुशी व इतर ग्रंथीच्या काम करण्याच्या पद्धतीवर परिणाम पडतो, त्यामुळे आपला हार्मोन्सचे संतुलन बिघडते.
इतकेच नव्हे तर साधी ताप येणे, बॉडीपेन, शारीरिक थकवा यासारख्या साध्या आजारापासून ते bp, शुगर, थायरॉइड, अस्थमा, पॅरालीसेस, हार्ट अटॅक यासरखे दुर्धर आजार सुद्धा आपल्या मेंदूच्या काम करण्याच्या पद्धतीतील बिघाड झाल्यामुळे उद्भवतात. मेंदूतील व शरीरातील ग्रंथीमधून जी रसायने स्त्रावत असतात त्यांच्यात बिघाड होऊन बहुतांश आजार सुरु झालेले असतात.
ताणतणावाचे व्यवस्थापन, भावनिक गुंता सोडवणूक, धाडस, आत्मविश्वास, आपले मानसिक आणि  शारीरिक आरोग्य, बौद्धिक क्षमता, आपल्या विविध क्षमता या आपल्या पियुशी ग्रंथीतून कोणते हार्मोन्स स्त्रावतात, यावर अवलंबून असते.

समुपदेशक
मनीषा बिक्कड / घुले
मेंदू विज्ञान व मानसशास्त्र आधारित उपचारात्मक पद्धती
9545440471

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …