21/06/25
Oplus_131072

पप्पु कागदे यांना डावल्यामुळे बीड जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार पाडणार रिपाई कामगार आघाडीचे भास्कर जावळे यांचा निर्धार

पप्पु कागदे यांना डावल्यामुळे बीड जिल्ह्यात महायुतीचे सर्व उमेदवार पाडणार

रिपाई कामगार आघाडीचे भास्कर जावळे यांचा निर्धार

बीड दि.२३(प्रतिनिधी)- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे नेते  तथा बीड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पप्पुजी कागदे यांनी केज मतदार संघातून उमेदवारीची मागणी केली होती. तसेच आमचे नेते ना. रामदास आठवले यांनी बीड मधील जाहीर कार्यक्रमात पप्पूजी कागदे यांची उमेदवारी जाहीर केली होती. परंतु भाजपच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या पहिल्या यादीमध्ये केज मतदार संघात पप्पुजी कागदे साहेब यांना महायुतीच्या लोकांनी मुद्दामहून डावले आहे. त्यामुळे दलित समाज महायुतीवर प्रचंड नाराज झाला आहे. बीड जिल्ह्यात रिपाई महायुतीच्या सर्व उमेदवारांच्या विरोधात काम करण्याचा इशारा
रिपाईचे कामगार आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष भास्कर जावळे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
बीड जिल्ह्यातच नव्हे तर महाराष्ट्रात रिपाईच्या ताकतीवर आणि कार्यकर्त्यांच्या जीवावर भाजप प्रणित महायुतीची सत्ता स्थापन झाली आहे. या सत्तेच्या काळात रिपाईचे राज्य अध्यक्ष पप्पूजी कागदे यांना वेळोवेळी फक्त आश्वासन दिले जात आहे. 2019 नंतर 2024 च्या निवडणुकीत केज मतदार संघातून महायुतीकडून त्यांना उमेदवारी मिळणे अपेक्षित होते तसे वातावरण निर्माण झाले आहे. परंतु नुकतीच महायुतीच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली. या पहिल्या यादीमध्ये बीड जिल्ह्यातील केज मतदार संघातील उमेदवाराची घोषणा केली. शेवटच्या क्षणापर्यंत पप्पूजी कागदे यांना उमेदवारी मिळेल अशी सर्व कार्यकर्त्यांना आशा होती. परंतु या कार्यकर्त्यांच्या आशेवर पाणी फिरण्याचे काम भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे यापुढे बीड जिल्ह्यामध्ये रिपाई महायुतीच्या कोणत्याच उमेदवाराचा प्रचार करणार नाही. उलट ज्या ठिकाणी महायुतीचा उमेदवार उभा असेल त्याच्या विरोधात त्याला पाडण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रिपाई कामगार आघाडीचे बीड तालुका अध्यक्ष भास्कर जावळे म्हणाले. या वेळी पुढे बोलताना भास्कर जावळे म्हणाले की, बीड जिल्ह्यात बीड जिल्ह्यातील रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी महायुतीच्या विरोधात गेल्याशिवाय महायुतीच्या नेत्यांना येणाऱ्या काळात रिपाईची ताकद कळणार नाही. रिपाईची ताकद काय आहे हे बीड जिल्ह्यातील महायुतीच्या उमेदवारांना आणि नेत्यांना दाखवुन दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाहीत असा निर्धार रिपाईच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी केला असल्याचे यावेळी भास्कर जावळे यांनी सांगितले.
_______________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …