21/06/25

टपाली मतपत्रिकांची कार्यवाही अचूकपणे पार पाडा – शैलेश सूर्यवंशी

टपाली मतपत्रिकांची कार्यवाही अचूकपणे पार पाडा
– शैलेश सूर्यवंशी

बीड दि. 26 (प्रतिनिधी) : बीड जिल्ह्यातील सहाही विधानसभा मतदारसंघातील अधिसूचित मतदार, ८५ वर्षांहून अधिक वय असलेले मतदार, मतदार यादीनुसार असलेले दिव्यांग मतदार, निवडणूक कर्तव्यार्थ नेमणुकीसाठी असलेल्या मतदारांसाठीच्या टपाली मतपत्रकांसाठी करावयाची कार्यवाही अचूकपणे पार पाडावी, अशा सूचना टपाली मतपत्रिका विभागाचे नोडल अधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हास्तरीय टपाली मतपत्रिका कक्षाच्यावतीने जिल्ह्यातील सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी, टपाली मतपत्रिकांचे नोडल अधिकारी यांचे ऑनलाईन माध्यमातून प्रशिक्षण आज पार पडले. प्रशिक्षण श्री. सूर्यवंशी आणि निवडणूक उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी दिले. यावेळी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख कृष्णा शिंदे, जिल्हा सहायक निबंधक ए.बी. अटुळे, जिल्हा सूचना अधिकारी भाऊसाहेब बांगर, तहसीलदार अविनाश शिंगटे, तंत्रज्ञ महादेव भाकरे यांची उपस्थिती होती.
प्रशिक्षणात इटीपीबीएमएस या इलेक्ट्रॉनिक प्रणालीद्वारे सेवा मतदार (संरक्षण दलातील मतदार) यांच्या मतपत्रिका, अधिसूचित मतदार, ८५ वर्षांवरील मतदार, दिव्यांग मतदार, मतदार यादीनुसार दिव्यांग मतदार आणि मतदानादिवशी मतदान केंद्रांवर जाऊन मतदान न करू शकणाऱ्या निवडणूक कर्तव्यार्थ नेमणूक केलेल्या मतदारांच्या मतपत्रिकांबाबत करावयाच्या कार्यवाहीबाबत सविस्तर मार्गदर्शन् श्री. सूर्यवंशी, श्री. कांबळे, श्री. बांगर यांनी केले. प्रशिक्षणास उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांच्या शंकांचे निरसनही मार्गदर्शकांनी यावेळी केले.
________________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …