ह.भ.प.भाग्यश्री ताई इरकर
यांची शिव कीर्तन सेवा संपन्न
बीड दि.१(प्रतिनिधी)-पवित्र तीर्थक्षेत्र संत शिरोमणी मन्मथ स्वामी संजीवन समाधी कपिलधार येथे बुधवार दिनांक 30 ऑक्टोबर रोजी मासिक शिवरात्री निमित्त शिव कीर्तन सेवा संपन्न झाली. या कीर्तन सेवेसाठी ताईंनी निरूपणासाठीll शिवा द्वारी उभी संतांची मंडळी ll तीच माझी दीवाळी ll अभंग घेतला.या संत अभंगावर शि.भ.प. भाग्यश्री ताई इरकर यांनी आपल्या या अभंगावर ताईंनी विवेचन करताना संत शिरोमणी महाराज यांच्या कार्यावर व भक्तीवर प्रकाश टाकला. भगवंताच्या समोर संत मंडळींना पाहिल्यानंतर आपली दिवाळी साजरी होते या दिवाळीमुळे आपणास मोक्ष प्राप्त करून देण्याची ताकद आहे आपले हित करा असा अमोल संदेश ताईंनी दिला, अतिशय रसाळ वाणी मधून संत शिरोमणी मन्मथ स्वामी महाराज यांचे चरित्र सांगितले. या कीर्तन सेवेला धनेगाव भजनी मंडळ, रामवडगाव,भ.म॔डळ कानडी, भ.मंडळ किर्तनकार विश्वनाथ स्वामी देवस्थान पुजारी, डाॅ. प्रशांत स्वामी कपीलाधार, माहेश्वरमुर्ती.शंकर स्वामी महाराज जायफळकर ,वाळके आबा गायक मन्मथ आप्पा लामतुरे व गायक सुनील आबा गुजर धनेगाव शिवहार इरकर दाभा, मृदंग सिध्देश्वर वांगसकर मसला , हार्मोनियम श्रीराम आंबेकर चाटा, गायक मन्मथ लामतुरे राम वडगाव,भागवत कोरे,आदी सहभागी झाले होते.