21/06/25
Oplus_131072

द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती  निमित्त वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन जास्तीत जास्त शाळा आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे- दीपक घुमरे

द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती  निमित्त वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

जास्तीत जास्त शाळा आणि
विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे- दीपक घुमरे

बीड दि.६ (प्रतिनिधी)-बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणारे आणि शिक्षक नेते म्हणून सर्व परिचित असणारे घुमरे शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय द. बा. तात्या घुमरे यांच्या जयंती समारोह कार्यक्रमानिमित्त विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धा व जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात
आले आहे. या वक्तृत्व स्पर्धेत आणि  विज्ञान प्रदर्शनामध्ये बीड शहरासह जिल्ह्यातील जास्तीत जास्त शाळा आणि विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असे आवाहन द.बा. तात्या घुमरे जयंती उत्सव समारोह अध्यक्ष तथा शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष शिक्षक नेते दीपक दादा घुमरे यांनी केले आहे.
बीड जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रामध्ये भरीव कामगिरी करणारे शिक्षकांच्या प्रश्नासाठी, त्यांच्या न्यायासाठी शासन प्रशासनाशी लढा देणारे शिक्षक नेते म्हणून बीड जिल्ह्यासह मराठवाड्यात महाराष्ट्रात स्वर्गीय द.बा. तात्या घुमरे यांना ओळखले जात होते. शिक्षकांच्या प्रश्नासोबतच द.बा. तात्या घुमरे यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. विद्यार्थी हाच केंद्रबिंदू म्हणून बीड जिल्ह्यामध्ये द.बा. तात्या घुमरे यांनी  घुमरे शिक्षण संस्था स्थापन करून या शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून दिली. आज घुमरे शिक्षण संस्थेतून हजारो विद्यार्थी शासन प्रशासनामध्ये कार्यरत आहेत. कित्येक विद्यार्थ्यांनी समाजात आपली आगळी वेगळी ओळख निर्माण केली आहे. शिवाय आज विविध क्षेत्रात ही घुमरे शिक्षण संस्थेचे विद्यार्थ्यांनी नामांकित व्यक्ती म्हणून आपली ओळख निर्माण केली आहे. तात्यांच्या कार्याची येणाऱ्या पिढीला आठवण राहावी या प्रमुख उद्देशाने द.बा. तात्या घुमरे यांच्या जयंतीच्या निमित्ताने मागील काही वर्षापासून विविध शालेय स्पर्धांचे आणि जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यावर्षीही द. बा. घुमरे शैक्षणिक संकुल बीड व स्वर्गीय द. बा. घुमरे तात्या जयंती उत्सव समितीच्या वतीने आठ फेब्रुवारी रोजी इयत्ता 8 ते इयत्ता 11 या वर्गातील विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये 1) ए पी जे अब्दुल कलाम एक विचार, 2) पोलादी पुरुष,
3) छत्रपती शिवाजी महाराज एक विचार, 4) घटनेचे शिल्पकार,
5) आधुनिक भारत एक पाऊल पुढे हे विषय देण्यात आले आहेत. या स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रोख रक्कम रुपये 5100 व स्मृती चिन्ह, द्वितीय बक्षीस रोख रक्कम रुपये 4100 व स्मृती चिन्ह, तृतीय बक्षीस रोख रक्कम रुपये 3100 व स्मृती चिन्ह तसेच उत्तेजनार्थ रोख रक्कम रूपये 1100 रु व स्मृती चिन्ह असे दोन बक्षीस दिले जाणार आहेत.या स्पर्धेसाठी श्री शेंडगे एम. आर. मो.न. 9405071345, श्री गव्हाणे बी. एन.  मो.नं. 9850325336 यांच्याशी संपर्क साधावा.
26 जानेवारी 2025 रोजी
इयत्ता 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांला रोख रक्कम रुपये 5100, स्मृती चिन्ह, दुसरे दुसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला रोख रक्कम रुपये 3100 रु व स्मृती चिन्ह, तिसरा क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला रोख रक्कम 2100 रु व स्मृती चिन्ह आणि उत्तेजनार्थ
रोख रक्कम रुपये 1100 रु. व स्मृती चिन्ह बक्षीस दिले जाणार आहे. विज्ञान प्रदर्शनासाठी श्री
देवढे व्ही. डी. सर मो.नं. 9890686980 श्री सानप ए. एस. सर 9834735288,
वक्तृत्व स्पर्धा नाव नोंदणी श्री शेळके सर यांच्याकडे करावी. या दोन्ही स्पर्धा द. बा. तात्या घुमरे शैक्षणिक संकुल द.बा. घुमरे पब्लिक स्कूल बीड येथे आयोजित करण्यात आल्या आहेत. या दोन्ही स्पर्धेसाठी जिल्ह्यातील शाळा आणि विद्यार्थ्यांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिक्षण संस्था संचालक महामंडळाचे जिल्हाध्यक्ष तथा या दबा घुमरे जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष दीपक दादा घुमरे यांनी केले आहे.
___________________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …