21/06/25
Oplus_131072

आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली -गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने महिला पत्रकार गितांजली लव्हाळे सन्मानित

आदर्श पत्रकार पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली -गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम

राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्काराने महिला पत्रकार गितांजली लव्हाळे सन्मानित

वडवणी दि.१२(प्रतिनिधी)-
वडवणी तालुक्या मधील खमक्या, जिगरबाज, डॅशिंगबाज,निर्भीड महिला पत्रकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महिला पत्रकार गितांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांच्या कार्याची दखल घेऊन
बीड येथील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार काल दि.१२ जानेवारी २०२५ रविवार रोजी बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या शानदार कार्यक्रमात माजी आमदार उषाताई दराडे
ह.भ.प.राधाताई महाराज,
ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे, समाजसेवक संजय कोठारी यांच्यासह इतर मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये देऊन गीतांजली मॅडम यांचा सन्मानित करण्यात आले. गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांना आदर्श राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
वडवणी तालुक्यामध्ये खमक्या, जिगरबाज, डॅशिंग, निर्भीड महिला पत्रकार म्हणून गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम यांना ओळखले जात आहे. त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक महिलांना गोरगरीब नागरिकांना येणाऱ्या अडीअडचणी सोडवण्याचे काम केले आहे. तसेच त्यांनी वडवणी पोलीस स्टेशन अंतर्गत महिला दक्षता कमिटीच्या सदस्य म्हणून यशस्वी काम केले आहे. यावेळी त्यांनी अनेक महिलांना मदत आणि न्याय मिळवून दिला. त्याच बरोबर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलनासाठी भरीव काम केले आहे. त्या नेहमी गरजू महिलांना मोफत साड्यां व गरीब विद्यार्थ्यांना मोफत शालेय साहित्याचे वाटप करतात. या त्यांच्या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक नामांकित व्यक्तिंनी आणि संस्थानी पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. नुकतेच त्यांच्या सर्व कार्याची कार्याची दखल घेऊन बीड येथील मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार जाहीर केला होता. या पुरस्काराच्या वितरण
राष्ट्रमाता जिजाऊ माॅं साहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचे औचित्य साधून काल 12 जानेवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य दिव्य कार्यक्रमात आदर्श पत्रकार पुरस्कार माजी आमदार उषाताई दराडे, ह.भ.प.राधाताई महाराज, ह.भ.प.मोहन महाराज खरमाटे, समाजसेवक संजय कोठारी यांच्यासह इतर मान्यवरांच्या शुभहस्ते देऊन सन्मानित करण्यात आले. सदरील पुरस्कार मिळाल्याबद्दल गीतांजली लव्हाळे वानखडे मॅडम यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनचा वर्षा होत आहे.

चौकट
पुरस्कारामुळे अधिक काम करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मिळाली -गीतांजली लव्हाळे वानखेडे मॅडम

राज्यस्तरीय आदर्श पत्रकार पुरस्कार स्वीकारल्यानंतर या पुरस्काराला उत्तर देताना निर्भीड महिला पत्रकार गितांजली लव्हाळे मॅडम म्हणाल्या की, मी जे कार्य मी करत आहे, त्या कार्याची दखल घेऊन त्याचा गौरव होत याचा मला मनस्वी आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे आणखीन कार्य करण्याची शक्ती प्रेरणा आणि स्फूर्ती मला मिळाली आहे. त्यामुळे मी अधिक जोमाने काम करणार आहे.
____________________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …