21/06/25

शेअर मार्केट मधील फसव्या ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा

शेअर मार्केट मधील फसव्या

ऍपद्वारे फसवणुकीचा नवा फंडा

 

 

शेअर मार्केट मधील करोडो अब्जो रुपयाच्या उलाढालीच्या बातम्या पाहून, वाचून अनेकजण आपणही यातपैसे कमवण्यासाठी प्रयत्न का करू नये असा विचार करीत असतात. प्रत्येकाच्या हातात स्मार्ट फोन तर असतोच असतो. मग काही सायबर भामटे व्हाट्सअपवर फेक मेसेज, लिंक ग्रुप वर जॉइन होण्यासाठी लिंक पाठवण्याचा
सतत मारा करत असतात. ते कीतीही वेळेस डिलीट केले तरी सतत व्हाट्सअपवर त्या लिंक येतच रहातात. मग आपण ऊत्सुकते पोटी त्या लिंकवर क्लिक करून ओपन करतो. आणि तो ग्रुप जॉइन केला जातो. मग त्यांचे
शेअर मार्केट ट्रेडिंग ऍप (APP) जे की ते फेक असते. ते आपल्याला डाउनलोड करायला सांगितल्या जाते. त्यात OTC आणि IPO असे दोन ट्रेडिंग चे प्रकार असतात. त्यानंतर त्या भामट्यांचा येक WhatsApp
discussion Group नावाचा ग्रुप असतो. त्या ग्रुप वर आपल्याला जॉइन केले जाते. त्या ग्रुपवर जवळपास 80%, 90% हे सर्व त्यांच्याच गॅंगचे भामटे लोक असतात. जेव्हा त्यांचे हे फेक ट्रेडिंग ऍप (App) जॉइन केल्या
नंतर ते त्यात आपले अकाऊंट ओपन करतात. लॉगिन, पासवर्ड दिला जातो. त्याच बरोबर आपले बँक डिटेल्स,आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल नंबर हे सर्व सोपस्कार पूर्ण केले जातात. नंतर ते आपले अकाऊंट रिचार्ज करायला सांगतात म्हणजे आपल्याला ट्रेडिंग करण्यासाठी त्यात पैसे टाकायला सांगतात. कमीत कमी पाच
हजारा पासून ते जास्तीत जास्त कितीही असू शकतात. ते पैसे जमा करण्यासाठी ते एक अकाऊंट नंबर देतात. त्यातील काही नावे तपती जलधारा, चिकन सेंटर, मटन सेंटर, ट्रेडिंग कंपनी आदी अनेक विविध नावाने
असतात आणि हे अकाऊंट फक्त 30 मिनिटेच अॅक्टिव राहील असे ते आपल्याला सांगतात. त्या दरम्यान त्यात पैसे नाही टाकता आले तर परत दुसर्‍या बँकेचे अकाऊंट नंबर देतात. अशा प्रकारची अनेक अकाऊंट त्यांचेकडे
असतात. मग त्या ऍप App अकाऊंट मधील जमा रक्कमे ( Balance) नुसार आपल्याला OTC अन्डर शेअर खरेदी
करायला सांगतात. ते ऐका कंपनीचे नाव देवून त्या कंपनीचे शेअर खरेदी करायला सांगतात आणि त्या कंपनीच्याच्या शेअरवर 10%, 30% ,50% अशा
प्रकारचा वेगवेगळा, आपल्या जमा असलेल्या रकमेनूसार सूट (Discount) देण्यात येते. मग शेअर खरेदी केल्या, केल्या लगेच त्यात आपल्याला फायदा झाल्याचे दिसते आपली रक्कम वाढलेली असते. हा प्रकार दुपारी
2 ते 4 वाजे पर्यन्त चालतो. मग दुसर्‍या दिवशी आपण खरेदी केलेल्या शेअरमध्ये 50 % ते 100% अधिक टक्के
फायदा झालेला दिसतो. ग्रुप मध्ये सामील असलेले त्या गॅंगचे भामटेही लाखोंचा फायदा झाल्याचे स्कीनशॉट त्या ग्रुपवर टाकत रहातात. त्या फायद्याचे स्क्रीन शॉट बघून आपले डोळे चक्राऊन जातात. आपणही येवढे पैसे
कमवू शकतो असे आपलायला वाटायला लागते. मग आपण अजून त्या अकाऊंट मध्ये पैसे टाकत रहातो.
आपल्याला त्या ऍप (app) मधील अकाऊंट वर लाखो रुपये फायदा झाल्याचे दिसते. तसेच रोज त्या फायद्यात लाखोंची वाढ होत असल्याचे आपल्याला दिसत राहते. मग हे भामटे नवीन आयपीओ मध्ये गुंतवणूक केल्यास
अजून 200% ते 500% फायद्याचे आमिष दाखवतात. ग्रुप मधील अनेकांना 200% 500% फायदा झाल्याचे स्क्रीन शॉट ही ग्रुप मधील भामटे टाकत रहातात. मग नव्या आयपीओ चे नाव ऍप APP टाकले जाते. ग्रुप मधील
भामट्याना झालेल्या फायद्याचे स्क्रीन शॉट बघून तो आयपीओ Subscribe करण्याचा मोह आपल्याला आवरत नाही. आयपीओ वर टच केल्या नंतर. IPO Subscribed असे दिसते. येथेच आपल्या फसवणुकीला
सुरुवात होते. पहिल्या दिवशी तो आयपीओ किती रुपयांचा आणि किती quantity चा खरेदी झालेला आहे ते त्यात दिसत नाही. मात्र दुसर्‍या दिवशी आपल्या अकाऊंट मधील पूर्ण रक्कम त्या आयपीओ मध्ये ( IPO) लॉक
झालेली दिसते. अकाऊंट मधील जमा रक्कमे पेक्षा जास्त रकमेचा आयपीओ खरेदी (Subscribed) केल्याचे त्यात दिसते. कारण त्या ऍप APP मध्ये आयपीओच्या खरेदीची Quantity ठरवन्याचा अधिकार आपल्याला
नसतो. जर समजा त्या ऍप APP अकाऊंट मध्ये 10 लाख रुपये जमा असतील तर 15 लाखाची त्या आयपीओची खरेदी (Subscribed) केल्याचे त्यात दिसते. मग अकाऊंट मधील आपले 10 लाख रुपये त्या आयपीओत लॉक
केले जातात. ते अनलॉक करायचे असल्यास परत 5 लाख त्या अकाऊंटवर जमा करावे लागतील असे सांगितले जाते. मग आपण ते दहा लाख अनलॉक करण्यासाठी 5 लाख रुपये अजून त्यात जमा करतो. 5 लाख रुपये जमा
केल्या नंतर ती पूर्ण रक्कम अनलॉक झाल्याचे त्या ऍप APP अकाऊंट वर दिसते. मग आपल्या त्या अकाऊंट मध्ये 15 लाख बॅलेन्स दिसतो. मग आपण त्यातील काही रक्कम काढून घेण्याचा (withdraw) विचार करतो. त्यानुसार तसा त्या APP द्वारे आपण अप्लाय करतो. आपण पैसे काढून (withdraw) घेण्यासाठी प्रयत्न करीत आहोत हे
त्यांना लगेच समजते. यानंतर हे ऍप APP वाले भामटे परत ती रक्कम एका नवीन आयपीओ मध्ये लॉक करून टाकतात आणि अजून पैसे जमा करायला सांगतात. तेव्हाच आपली पूर्ण रक्कम अनलॉक होईल असे सांगितल्या
जाते. आपल्या जो पर्यन्त लक्षात येत नाही तो पर्यन्त हे असेच सुरू राहते. जेव्हा आपल्या सोबत फसवणुक होत आहे हे आपल्या लक्षात आलेले आहे. तेव्हा हे सायबर भामटे आपले ते ऍप APP अकाऊंट ACCESS लॉक
करुन टाकतात. तसेच ग्रुप मधून आपला नंबरही डिलीट करून टाकतात. फोन उचलने बंद करतात. साहजिकच
आपला त्यांच्याशी कॉनटॅक्ट संपतो. मग आपली पूर्णपणे फसवणूक झाली आहे हे आपल्या लक्षात येते. यानंतर आपण काय करणार आहोत हे साईबर गुन्हेगाराला माहीत असते. साहजिकच अनेकजण सायबर क्राइम पोलिसांकडे तक्रार करतात. ऑनलाइन पोर्टलवर किंवा हेल्प लाइन नंबर वर ही तक्रार केली जाते. हे त्या भामट्याना माहीत असते. हे ते ओळखून असतात. सायबरक्राइम पोलीस आपली तक्रार आल्यावर त्या भामट्याचे अकाऊंट लॉक, होल्ड करतात. त्यांचे असे अकाऊंट लॉक, होल्ड करून काही उपयोग होत नाही
कारण हे भामटे आपण पैसे जमा केलेले अकाऊंट फक्त 30 मिनीटा साठीच वापरत असतात. त्याच दरम्यान त्या अकाऊंट मध्ये जमा झालेली पूर्ण रक्कम ते लगेच काढून घेतात. त्यामुळे सायबर क्राइम पोलिसही हताश होतात. मग पोलिस स्टेशन मध्ये चकरा मारणे सुरू होते. हाती काहीच लागत नाही. हे भामटे शक्यतो परराज्यातील, कदाचित बाहेरच्या देशातील सुद्धा असू शकतात. कारण त्यांचे खरे चेहरे कधी दिसत नाहीत, त्याचे फोन नंबर,
नावे हे फेक असतात. बँकेतील अकाऊंटस द्वारा पोलिसांनी या भामट्या पर्यन्त पोहोचायचा प्रयत्न केला तर ते अकाऊंट धारक झोपडपट्टीलील अतिशय गरीब लोक असतात. त्यांच्या नावावर असे मोठे व्यवहार होत
असल्याचे त्यांना माहित ही नसते असे एका पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले अशा प्रकारे फसवणुकीची नवी पद्धत हे भामटे वापरत आहेत. या सायबर भामट्याच्या जाळ्यात डॉक्टर इंजिनीअर, व्यापारी असे अनेकजण अडकत आहेत. अशाच प्रकारच्या फसवणुकीच्या रोज नव नव्या तक्रारी सायबर क्राईम पोलिसाकडे येत आहेत. त्यामुळे अशा फेक अप (APP) वर विश्वास ठेऊ नये असे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे. अशाच एका फेक App चा फोटो बाजूला दिलेला आहे. त्यावरून असे फेक APP ओळखता येवू शकतील.
त्यामुळे सावध राहणे एकच पर्याय आहे.

   लेखक
श्री. विश्वंबर देशमुख, देवडीकर

मुंबई मो. 915221356

____________________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …