अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जिल्हाध्यक्षपदी अशोक होळकर यांची निवड
बीड दि.२३(प्रतिनिधी)-
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रहारचे संपादक श्री अशोक होळकर यांची नियुक्ती करण्यात आली. बीड जिल्हा अध्यक्षपदी होळकर यांची निवड होताच त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाचे कार्य संपूर्ण राज्यभरात असून ग्रामीण भागातील पत्रकारांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी संघ काम करीत आहे. केंद्रीय अध्यक्ष मनोहर सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख, मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांच्या सुचनेवरून अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या बीड जिल्हाध्यक्षपदी प्रहारचे संपादक श्री अशोक होळकर यांची नियुक्ती करण्यात आली.पत्रकार संघाच्या ध्येय धोरणानुसार काम करून संघटना वाढीसाठी आणि पत्रकारांच्या हितासाठी काम करण्याच्या सूचना या पत्रामध्ये देण्यात आल्या आहेत. या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. तर निवडीनंतर श्री अशोक होळकर यांनी ग्रामीण पत्रकार संघाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पत्रकारांचे प्रश्न शासन दरबारी मांडून ते सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.