*शिवसंग्राम युवती जिल्हाध्यक्ष पदी गितांजली देसाई यांची नियुक्ती.*
*आगामी काळात शिवसंग्राम महिला व युवतीसाठी विशेष उपक्रमातून घरोघरी पोहचणार.*
बीड दि.२ (प्रतिनिधी) :-
गेल्या कित्येक काळात महाराष्ट्राच्या राजकारणा सोबतच बीड विधानसभा मतदारसंघात ही सामाजिक व राजकीय क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटवला आहे. स्व. विनायकराव मेटे साहेबांच्या नंतर डॉ ज्योती ताईसाहेब मेटे यांनी कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहत लोकसभा व विधानसभा निवडणूकीला ठोसपणे सामोरे गेले आहेत.
येत्या काळात येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पक्ष बांधणी व कार्यकर्त्यांच्या पदाधिकारी नियुक्ती संदर्भात जिल्हा बैठक आज २ मार्च २०२५ रोजी शिवसंग्राम भवन नगर नाका या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित करण्यात आलेली होती.
या जिल्हा कार्यकारणी बैठकीत सर्वानुमते जिल्हाप्रमुख प्रा. सुभाष जाधव सर यांनी शिवसंग्राम युवती आघाडीच्या जिल्हाप्रमुख पदी सामाजिक कार्यातील अग्रेसर असणाऱ्या व स्व. विनायकराव मेटे साहेब यांच्या काळापासून डॉ. ज्योती ताई मेटे यांच्या विश्वासू असणाऱ्या सौ. गितांजली देसाई – डोरले यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
या नियुक्तीच्या अनुषंगाने शिवसंग्राम राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. ज्योती ताईसाहेब मेटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रभाकर आप्पा कोलांगडे, पंडित माने, सुहास पाटील यांच्यासह सर्वच आघाडीचे प्रमुख व पदाधिकारी यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत.