21/06/25
Oplus_131072

महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या समर्थनात वामन मेश्राम यांची उद्या मूलनिवासी बहुजन समाज जोडो यात्रा बीडमध्ये होणार दाखल बीड शहरात विशाल जनसभेचे आयोजन भामुमोचे मधुकर काळे यांची माहिती

महाराष्ट्रात ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींच्या जातनिहाय जनगणनेच्या समर्थनात

वामन मेश्राम यांची उद्या मूलनिवासी बहुजन
समाज जोडो यात्रा बीडमध्ये होणार दाखल

बीड शहरात विशाल जनसभेचे आयोजन

भामुमोचे मधुकर काळे यांची माहिती

बीड दि.३(प्रतिनिधी)-
ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींची जाती आधारीत जनगणना करण्याच्या समर्थनात भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा देशपातळीवर प्रबोधन आणि महाजागरण करुन राष्टॄव्यापीस्तरावर या संघटनांच्या माध्यमातून 9 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रव्यापी जेल भरो आंदोलनाची तयारी करत आहे. त्या अनुषंगाने भामुमोचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात मूलनिवासी बहुजनन समाज जोडो यात्रा काढण्यात आली असून उद्या वामन मेश्राम यांची ही यात्रा बीडमध्ये दाखल होत आहे. यावेळी बीड शहरात विशाल जनसभेचे सांयकाळी 5 वाजता आयोजन करण्यात आले असल्याची माहिती भामुमोचे मधुकर काळे यांनी दिली असून या जनसभेस बहुसंख्येने मूलनिवासी बहुजन समाजाने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, की बामसेफ भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने देशातील मूलनिवासी बहुजन समाजामध्ये प्रबोधनाच्या माध्यमातून जागृती निर्माण करुन या संघटनांच्या माध्यमातून मूलनिवासीयांच्या हक्क-अधिकारांसाठी संघर्ष केला जात आहे. मात्र मूलनिवासी बहुजन समाजाच्या प्रश्नांचे मुळ हे ईव्हीमध्ये मशीन मध्ये दडल्याने त्यांच्या कोणत्याही समस्यांचे समाधान होतांना दिसत नाही. त्यामुळेच ओबीसींची जातनिहाय जनगणना होत नसल्याने ईव्हीएम च्या विरोधात आणि ओबीसींची जातनिहाय जनगणनेच्या समर्थनाथ तसेच बहुजन महापुरुषांच्या होणार्‍या अवमाना विरोधात जनजागृती करण्यासाठी भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा आणि राष्ट्रीय परिवर्तन मोर्चाच्या वतीने महाराष्ट्रात वामन मेश्राम यांच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात परिवर्तन यात्रा काढली जात आहे. ही परिवर्तन यात्रा बीड शहरात उद्या मंगळवारी (दि.3) रोजी पोहचत असून त्यानिमित्ताने शहरातील नगररोडवरील हॉटेल निलकमलमध्ये सायंकाळी 5 वाजता जनसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेचे उद्घाटन महामानव प्रतिष्ठानचे अध्यक्ष दत्तात्रय विसवळे यांच्या हस्ते होणार असून मुख्य अतिथी शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख गणेश वरेकर, रत्नाकरअप्पा शिंदे, माजी नगराध्यक्ष सय्यद मोईन मास्टर, हाशमी सय्यद शफिक अहमद, शेतकरी संघटनेचे मोहनराव गुंड, अ‍ॅड. नरायण गोले, राष्ट्रवादी किसान सेलचे जिल्हाध्यक्ष ईनामदार चाँद पाशा, डॉ. रघुनाथ जोगदंड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या जनसभेस बहुसंख्येने उपस्थिती राहण्याचे आवाहन भारत मुक्ती मोर्चाचे मधुकर काळे यांनी केले आहे.

* महत्वपूर्ण चौकट

एप्रिलमध्ये जेलभरो आंदोलन तर जुलैमध्ये भारत बंद
ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसींच्या जाती आधारीत जनगणनेसह अन्य महत्वपूर्ण मुद्यांवर भारत मुक्ती मोर्चा, राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा देशपातळीवर मूलनिवासी बहुजन समाजामध्ये प्रबोधन आणि महाजागरण करुन राष्ट्रीय स्तरावर या संघटनांच्या माध्यमातून 9 एप्रिल 2025 रोजी जेल भरो आंदोलन तर ता.1 जुलै 2025 ला भारत बंद करण्याची हक्क भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी दिली आहे. त्यापार्श्वभूमीवर या आंदोलनाची तयारी करण्यासाठी प्रबोधन आणि जागृतीसाठी महाराष्ट्रात मूलनिवासी बहुजन समाज जोडो ही परिर्वतन यात्रा राज्यात काढण्यात आली असून ठिक-ठिकाणी या परिवर्तन यात्रेला मूलनिवासी बहुजन समाजाचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असून ईव्हीएम विरोधात या माध्यमातून मोठे जनआंदोलन छेडले जाणार असल्याचे दिसत आहे. त्याचीच भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष वामन मेश्राम यांनी मोठ्या प्रमाणात तयारी केल्याचे बोलले जात असून या जनआंदोलनाच्या रेट्याने ईव्हीएम कायमचे हद्दपार होणार का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …