…अखेर यावर्षीच्या संचमान्यता मुख्याध्यापक लॉगीनला जनरेट झाल्या!
राज्य कृती समितीच्या खंडेराव जगदाळे सरांच्या प्रयत्नांना यश
बीड दि.21 (प्रतिनिधी)-शैक्षणिक वर्ष 2024 -25 हे वर्ष संपत आले तरी संच मान्यता जनरेट झाल्या नव्हत्या. त्यामुळे महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने मागील महिनाभरापासून राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी शिक्षण संचालक यांच्याकडे संचमान्यता जनरेट करण्याबाबत तोंडी आणि लेखी निवेदनाद्वारे पाठपुरावा केला होता. या विषयी 17 मार्च रोजी खंडेराव जगदाळे सर यांनी संचालक यांना निवेदन देऊन 31 मार्चपर्यंत संच मान्यता जनरेट करा अन्यथा 01 एप्रिल पासून शिक्षण संचालकाच्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत शिक्षण संचालकांनी
काल 20 मार्च रोजी मुख्याध्यापक लॉगिनला शैक्षणिक वर्ष 2024 25 च्या संच मान्यता जनरेट केल्या. काल 20 मार्च रोजी रात्री मुख्याध्यापक यांच्या लॉगिनला संच मान्यता जनरेट होताच
शिक्षण संचालक आणि कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांचे मुख्याध्यापक वर्गाकडून आभार मानले जात आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की शैक्षणिक वर्ष 2024- 25 या वर्षातील संच मान्यता शैक्षणिक वर्ष संपत आले तरीही जनरेट झाल्या नव्हत्या. या संदर्भात महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीच्या वतीने संघटनेचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांनी मागील महिनाभरापासून शिक्षण संचालक यांच्याकडे संच मान्यता जनरेट करण्यासाठी पाठपुरावा केला होता. शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वारंवार तोंडी आणि लेखी निवेदनाद्वारे ही मागणी लावून धरली होती. 17 मार्च रोजी शाळा कृती समितीचे राज्य उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे यांनी शिक्षण संचालकांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले होते. तसेच संबंधित खात्याच्या मंत्र्यांनाकडे ही याबाबत विविध माध्यमांतून त्यांचा पाठपुरावा सुरूच ठेवला होता. दरम्यान जगदाळे सरांनी शिक्षण संचालक यांची भेट घेऊन 31 मार्चपूर्वी संच मान्यता जनरेट कराव्यात अन्यथा 01 एप्रिल पासून आपल्या कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा निवेदनाद्वारे दिला होता. अखेर खंडेराव जगदाळे सर यांच्या प्रयत्नाला यश आले. जगदाळे सरांच्या तीव्र आंदोलनाच्या इशा-याची शिक्षण संचालकांनी गांभीर्याने दखल घेत
काल 20 मार्च रोजी माध्यमिक शाळांच्या संचमान्यता मुख्याध्यापकांच्या लाॅगीनला उपलब्ध करून दिल्या.
माध्यमिक शाळांच्या संचमान्यता मुख्याध्यापकांच्या लाॅगीनला जनरेट होताच राज्यातील अंशतः अनुदानित प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील कार्यरत ७५००० कर्मचाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. संघटनेचे उपाध्यक्ष खंडेराव जगदाळे सर यांच्या प्रयत्नांना व पाठपुराव्यास मिळालेल्या या अद्वितीय यशाबद्दल शिक्षण संचालक आणि महाराष्ट्र राज्य व संघटनेचे राज्य उपाध्यक्ष तथा संघर्षयोद्धा खंडेराव जगदाळे यांचे महाराष्ट्र राज्य कृती समिती बीडच्या वतीने जिल्हाध्यक्ष आत्माराम वाव्हळ यांच्यासह
मराठवाडा विभागाचे विभागीय अध्यक्ष वैजनाथ चाटे, छत्रपती संभाजी नगर विभागाचे कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे, छत्रपती संभाजी नगर विभागाचे निरीक्षक विजयसिंह शिंदे महिला संघटनेच्या महिला आघाडीच्या मराठवाडा संघटक मुक्ता मोटे, दैवशाला मुंडे, सुरेखा गायकवाड मॅडम, मस्के मॅडम, जिल्ह्याचे पदाधिकारी सौंदलकर, शेख, जिल्हा उपाध्यक्ष रामदास जामकर, पंकज कळसकर, बीड तालुकाध्यक्ष भागवत यादव, वडवणी तालुका अध्यक्ष वैजिनाथ शिंदे, गेवराई तालुका अध्यक्ष दीपक गरूड, आष्टी तालुका अध्यक्ष रविंद्र भुकन, पठाण, मोरे , गवळी, बाळासाहेब नागरगोजे, प्रताप देशमुख, श्रीराम जाधव, गोविंद आघाव, भालके, सुरेश कदम, जावेद पठाण, मुंडे यांच्यासह आदींनी आभार मानले.
————————–