21/06/25

अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

अंशतः अनुदानित शाळांना टप्पा वाढ मागणीसाठी आझाद मैदानात
महिला शिक्षकांचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे अनर्थ टळला

मुंबई दि.24(प्रतिनिधी )-
राज्यातील अंशतः अनुदानित शाळांना वाढीव अनुदानाच्या टप्प्यासाठी निधीची तरतूद करा या मागणीसाठी राज्यातील शिक्षकांनी आझाद मैदानावर आंदोलन सुरू केले. परंतु आपल्या हक्काच्या वेतनासाठी सातत्याने आंदोलन करून ही सरकारला कसलीच जाग येत नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या महिला शिक्षिकांनी अंगावर रॉकेल ओतून घेत स्वतःला जाळून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. या घटनेने आझाद मैदान परिसरात एकच खळबळ उडाली.
राज्यातील अंशतः अनुदानित, विनाअनुदानित त्रुटी पूर्तता केलेल्या शाळा व मूल्यांकनास पात्र असलेल्या शाळांचे सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी आझाद मैदानावर आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करीत आहेत. परंतु सातत्याने आंदोलन करून आपल्या हक्काच्या मागण्या शासनापुढे मांडून देखील शासन आपल्या मागण्या पूर्ण करत नाहीत. आम्ही सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतानाही सरकार आमच्या मागण्याबद्दल सहानुभूतीपूर्वक विचार करत नाही त्यामुळे आझाद मैदानात आंदोलन करणाऱ्या शिक्षकवृंदात संतापाचे वातावरण निर्माण झाले. यावेळी तीव्र संतापलेल्या गावंडे मॅडम आणि साळवी मॅडम या दोन्ही मॅडम दोन महिला शिक्षिकांनी काल दिनांक 24 मार्च 2025 रोजी दुपारी 3:00 वाजण्याच्या सुमारास आझाद मैदानात स्वतःच्या अंगावरती रॉकेल ओतून स्वतःला जाळून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला. या घटनेने आझाद मैदान परिसरात एकच खळबळ उडाली. दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांना मिळताच त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत सर्व प्रकारची माहिती घेतली. यावेळी जीवाचं बरं वाईट करू नका किंवा आत्मदहना सारख्या मार्ग अवलंबून आपलं जीवन संपवू नका. शांततेच्या मार्गाने आपल्या मागण्या सरकारकडे मांडू. सरकार निश्चितच आपल्या मागण्या पूर्ण करेल असा विश्वास यावेळी शिक्षक आ. ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी व्यक्त करत कोणत्याही शिक्षकांनी चुकीचं पाऊल उचलू नये असे आवाहन आंदोलनकर्त्यां शिक्षकांना केले.
________________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …