न.प.बीडच्या टँकर चालक विनायक गायकवाड यांनी स्वखर्चातून जिव्हाळा बेघर निवारा केंद्राला दिले मोफत पाणी!
बीड दि.२३(प्रतिनिधी)- मागील काही दिवसांपासून बीड शहरात तांत्रिक अडचणीमुळे भीषण पाणी टंचाई जाणवत असून अशा ही परिस्थितीत नगर पालिकेच्या पाणी पुरवठा करणाऱ्या टँकरवरील चालक विनायक तमन्ना गायकवाड यांनी जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील वृद्ध, विकलांग, निराधार लाभार्थी पाण्यासाठी वणवण भटकत असतानाचे दृश्य पाहीले व त्यांनी या गरजुना स्व खर्चाने आठ दिवस पुरेल इतके मुबलक पाणी उपलब्ध करून दिले. त्यांच्या या कार्याचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे .
न.प.बीडच्या टँकर चालक विनायक गायकवाड यांनी बीड शहरातील विविध दानशूर व्यक्ती, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक क्षेत्रातील संघटनांनी त्यांच्या कार्याची प्रेरणा घेऊन आपल्याबरोबरच इतरांना जिव्हाळा बेघर निवारा केंद्रातील गरजु लाभार्थ्यांसाठी आपल्या परिवारातील सदस्या समवेत वाढदिवस असो की इतर कार्यक्रम अशा अनेक कार्याच्या माध्यमातून येथील वृद्ध, विकलांग, निराधार लाभार्थी यांना एकवेळसाठी नाममात्र एक हजार पाचशे रुपये भरुन अन्नदान, वस्त्रदानासाठी पुढे यावे तसेच तन- मन- धनाने सहकार्य करावे असे आवाहन चालक विनायक तमन्ना गायकवाड यांच्यासह जिव्हाळा बेघर निवारा केंद्राचे व्यवस्थापक राजू वंजारे, संचालक अभिजित वैद्य, यश वंजारे, मदतनीस छाया सरोदे यांनी केले आहे.