21/06/25

वेदिका केकान राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय

वेदिका केकान राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय

पिंपळनेर दि.२६(प्रतिनिधी) : बीड तालुक्यातील पिंपळनेर येथील श्री व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूल ची विद्यार्थिनी वेदिका दादाहरी केकान हिने जानेवारीमध्ये आय.एम. विनर राज्यस्तरीय प्रज्ञाशोध परीक्षेत जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा मान मिळवला आहे. तिच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पिंपळनेर येथील व्यंकटेश इंटरनॅशनल स्कूलची विद्यार्थिनी वेदिका केकान हिने जानेवारी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या प्रज्ञाशोध परीक्षेत सहभाग घेतला होता. अतिशय हुशार असलेल्या या विद्यार्थ्यीने या परीक्षेत जिल्ह्यातून द्वितीय क्रमांक मिळवला आहे. याच शाळेची आर्या मनोज तेहरे ही एप्रिल २०२३ मध्ये जिल्ह्यातून प्रथम आली होती. विद्यालयाची हीच यशाची परंपरा वेदिका केकाण हिने यावर्षी कायम ठेवली आहे. तिच्या या यशाबद्दल संस्थेचे सचिव भगवानराव जाधव, संस्थाध्यक्ष प्रा. सुरेश सावंत, उपाध्यक्ष डॉ. गणेश नरवडे, प्राचार्य राम कांबळे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दत्ता तोगे, उदय खरात, मुकुंद आबूज, टीटु नायक, सुरेखा यादव, सगुना डोरले, श्रद्धा नागेश, दिव्या लोळगे, ज्योती राऊत, शेख लजीना, अमोल ठोकरे सह पालकांनी अभिनंदन केले.

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …