21/06/25

बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ*

*बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली*
*शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!*

*मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस*
*हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ*

========================

बीड, प्रतिनिधी-   नापाक पाकचे मनसुबे उद्धवस्त करणारे ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबवणाऱ्या भारतीय सैन्याच्या सन्मानार्थ काल शनिवार दि २४ मे २०२५ रोजी दु. 12: 00 वाजता महाराष्ट्र राज्याचे सामाजिक न्याय मंत्री तथा शिवसेना नेते मा. ना. संजयजी शिरसाट साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न झाली. या तिरंगा रॅलीत बीडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला तर या रॅलीत युवकांनी ट्रॅक्टरमध्ये सैनिकांची वेशभूषा परिधान करून आपले देशप्रेम व्यक्त केले. याबरोबरच असंख्य तरुण हाती तिरंगा झेंडा घेऊन भर पावसात भारत माता की जय, वंदे मातरम या घोषणा देत मोटारसायकलवर स्वार झाले.  मंत्री ना. संजयजी शिरसाट साहेब यांनी सर्वोप्रथम विश्ववंदनीय भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून तिरंगा रॅलीस हिरवा झेंडा दाखवून रॅलीचा प्रारंभ केला. यानंतर लागलीच शिवसेना जिल्हाप्रमुख अनिलदादा जगताप, जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, जिल्हाप्रमुख स्वप्निल गलधर यांच्यासह तिरंगा रॅलीत सहभागी झाले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत ही भव्य रॅली काढण्यात आली. सर्वांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि नंतर सीमारेषेवर मातृभूमीसाठी बलिदान देणाऱ्या शूरवीरांना सामूहिक श्रद्धांजली अर्पण केली. देशाच्या मातीसाठी, आपल्या लेकरांसाठी, आपल्या भविष्यासाठी आपल्या प्राणांची तमा न बाळगता लढणाऱ्या भारतीय सैन्याला अभिवादन करण्याकरिता भर पावसात बीडमधून प्रतिष्ठित नागरिक तथा असंख्य तरुण राष्ट्रीय ध्वज हाती घेऊन रॅलीत सहभागी झाले होते, यावरून बीडकरांच्या निस्सीम देशभक्ती आणि देशप्रेमाचे दर्शन घडून आले.  याप्रसंगी शिवसेना विभागीय सचिव अशोकपटवर्धन साहेब, बीड जिल्हा संपर्कप्रमुख बाप्पूसाहेब मोरे, माझे सहकारी जिल्हाप्रमुख सचिन मुळूक, स्वप्नील गलधर, युवासेनेचे बाजीराव चव्हाण, विपुल पिंगळे, अविनाश जाधव, सागर बहिर, अलकाताई डावकर, चंद्रकलाताई बांगर, रविराज बडे, सुजित शिंदे, गणेश शिराळे, मनोज चव्हाण यांच्यासह शिवसेना, महिला आघाडी, युवासेना, शेतकरी सेना, एसटी कामगार सेना ओबीसी व्हिजेएनटीसेना तथा अंगीकृत संघटनांचे सर्व आजी-माजी पदाधिकारी लोकप्रतिनिधी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
°°°°°

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …