21/06/25

बेघरांचे आश्रयस्थान- ‘जिव्हाळा’ ला सिनेकलावंत डॉ महेशकुमार वनवे यांचा आर्थिक मदतीचा हात

बेघरांचे आश्रयस्थान- ‘जिव्हाळा’ ला सिनेकलावंत डॉ महेशकुमार वनवे यांचा आर्थिक मदतीचा हात

बीड दि.31(प्रतिनिधी)-
बेघर-वंचित-असहाय्य-निष्काशित -अशा सर्वच वयोगटातील निराधारांचे निवारा-आश्रयस्थान असलेले,बीड शहरातील भाजी-मंडईस्थित ‘जिव्हाळा’ या केंद्रात ‘वामा- लढाई सन्मानाची’ या मराठी चित्रपटाचे प्रमुख कलाकार बीड जिल्ह्याचे सुपुत्र डॉ महेशकुमार वनवे यांनी बालकांना कपडे व सर्वांना गोड-धोड जेवणासाठी आर्थिक मदत संचालक राजू वंजारे यांचेकडे लगेच दिली.
या बाबत अधिक माहिती अशी की,’जिव्हाळा’ केंद्राने सिने कलावंत डॉ महेशकुमार वनवे यांचा सत्कार व राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 300व्या जयंतीनिमित्त कार्यक्रमांचे आयोजन केले होते. प्रथम राजमातेस निमंत्रितांनी विनम्रपणे अभिवादन केले. काकडहिरा गावच्या आदर्श सरपंच प्रिती बागलाने, छाया सरोदे, माया चव्हाण यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. मातृभूमी प्रतिष्ठानच्या वतीने अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते डॉ संजय तांदळे यांनी प्रमाणपत्र देवुन महेशकुमार वनवे यांचा सन्मान केला. तत्कालीन प्रथेप्रमाणे सती न जाता, अहिल्यादेवीने शौर्य-कर्तबगारी-जबाबदारी ने 29 वर्ष लोककल्याण कारी राज्यकारभार केल्याचे,आपल्या मनोगता मधून प्राचार्य डी जी तांदळे यांनी मांडणी केली. से नि मुख्याध्यापक मस्के यांनी काव्य गायनाविष्कार सुंदर प्रस्तुत केला. वर्तमान व्यवस्थेत पुष्कळ जन आपल्यापेक्षा कितीतरी पटीने अधिक वेदना, दु:ख, दैना झेलत असल्याचे ऐकून-पाहून महेशकुमार भावविवश झाले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डी जी तांदळे, तर प्रमुख अतिथी सरपंच प्रिती बागलाने, से निअभियंता कांचन गायकवाड, सौ. गायकवाड, बीड शहर बचाव मंच चे निमंत्रक नितीन जायभाये,मातृभूमी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ संजय तांदळे, लेक लाडकी अभियानचे बाजीराव ढाकणे होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन केंद्राचे संचालक राजू वंजारे यांनी तर निमंत्रितांचे आभार दुसरे संचालक अभिजित वैद्य यांनी मानले .

Check Also

बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा झेंडा दाखवून केला प्रारंभ*

*बीडवासियांच्या देशभक्तीने ओथंबलेली* *शिवसेनेची भव्य तिरंगा रॅली संपन्न!* *मंत्री संजय शिरसाट यांनी तिरंगा रॅलीस* *हिरवा …