22/06/25

आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!

आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात जिल्ह्यातील शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित सहभागी व्हावे

बीड जिल्हा विना अनुदान शाळा कृती समितीचे आवाहन!

बीड दि.२२(प्रतिनिधी)- विनाअनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांना
वाढीव टप्प्याचे अनुदानासाठी निधीची तरतूद उपलब्ध करून द्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या वतीने दिनांक ५ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे धरणे आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी व आपल्या हक्काचा टप्पा वाढीचा निधी पदरात पाडून घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विनाअनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे सर, मराठवाडा निरिक्षक विजयसिंह शिंदे सर, छत्रपती संभाजी नगर विभाग कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे सर, मराठवाडा छत्रपती संभाजी नगर विभागाचे संघटक पंकज कळसकर सर, मराठवाडा महिला सचिव श्रीमती मुक्ता आर्दड (मोटे) मॅडम बीड जिल्हाध्यक्ष श्री आत्माराम वाव्हळ सर यांनी केले आहे.
राज्यातील अंशतः अनुदानित शिक्षकांच्या वाढीव टप्प्याच्या वेतनासाठी दिनांक १४ ऑक्टोंबर २०२४ रोजी तात्कालीन राज्य सरकारने धोरणात्मक निर्णय घेऊन या संदर्भातला शासननिर्णय ही काढला होता. दरम्यान निवडणुका होऊन पुन्हा शिवसेना भाजपाचे सरकार सत्तेत आले. या नवीन सरकारच्या विधिमंडळाची दोन अधिवेशन पार पडली, परंतु या अधिवेशना दरम्यान वाढीव टप्प्यासाठी लागणाऱ्या आर्थिक निधीची तरतूद मात्र झाली नाही. त्यामुळे हजारो शिक्षकांचा हिरमोड झाला. परंतु सरकारने आमचा, आमच्या वयाचा, आमच्या सेवेचा आमच्या घरांचा आणि घरातली व्यक्तींचा विचार करून आमच्या पुढील वाढीव टप्पा अनुदानासाठी भरीव आर्थिक निधीची तरतूद करावी या मागणीसाठी विनाअनुदानित शिक्षकांसाठी कार्यरत असणारी मातृ संघटना महाराष्ट्र राज्य विनाअनुदानित शाळा कृती समितीने ५ जून पासून मुंबई शहरातील आझाद मैदान येथे आंदोलन सुरू केले आहे. आज आंदोलनाचा 18 वा दिवस आहे. या आंदोलनास पाठिंबा देण्यासाठी आणि आपल्या हक्काचे वेतन पदरात पाडून घेण्यासाठी बीड जिल्ह्यातील विनाअनुदानित अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन विना अनुदानित शाळा कृती समितीचे मराठवाडा कार्याध्यक्ष वैजनाथ चाटे सर, मराठवाडा निरिक्षक विजयसिंह शिंदे सर, छत्रपती संभाजी नगर विभाग कार्याध्यक्ष जितेंद्र डोंगरे सर, मराठवाडा छत्रपती संभाजी नगर विभागाचे संघटक पंकज कळसकर सर, मराठवाडा महिला सचिव श्रीमती मुक्ता आर्दड (मोटे) मॅडम बीड जिल्हाध्यक्ष
श्री आत्माराम वाव्हळ सर, जिल्हा कार्याध्यक्ष श्री. प्रताप पवार सर,उपाध्यक्ष श्री. रामदास जामकर सर ,उपाध्यक्ष श्री. अरविंद सौंदलकर सर,
जिल्हा सचिव श्री. शेख सर जिल्हा संघटक
प्रताप देशमुख सर,जिल्हा सहसंघटक श्री. बाळासाहेब नागरगोजे सर, महिला उपजिल्हा अध्यक्षा दैवशाला मुंढे मॅडम, महिला सचिव सुरेखा गायकवाड मॅडम बीड तालुका अध्यक्ष श्री. भागवत यादव सर,गेवराई तालुका अध्यक्ष श्री. दीपक गरूड सर, आष्टी तालुका अध्यक्ष श्री. रविंद्र भुकन सर,पाटोदा तालुका अध्यक्ष श्री. अंकुश गवळी सर,शिरूर तालुका अध्यक्ष श्री. दशरथ साबळे सर,माजलगाव तालुका अध्यक्ष श्री. चंद्रशेखर तौर सर, वडवणी तालुका अध्यक्ष श्री. वैजनाथ शिंदे सर, परळी तालुका अध्यक्ष श्री गोविंद आघाव सर, धारूर तालुका अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मुंडे यांच्या सह जिल्हा विविध पदाधिकारी यांनी केले आहे.
_______________________________________________________________

Check Also

शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* *मंत्री ना. संजयजी शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत बीड जिल्हा शिवसेनेची आढावा बैठक संपन्न!*

*शिवसैनिकांनो, तुम्ही पक्ष संघटन मजबूत करा तुम्हाला बळ देण्याचे काम मी करेल- ना. संजयजी शिरसाट* …