16/11/26

बीडचे भूमिपुत्र चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जि. प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती

बीडचे भूमिपुत्र चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जि. प.च्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदावर पदोन्नती

छत्रपती संभाजीनगर दि.१८(प्रतिनिधी) –
बीडचे भूमिपुत्र तथा कन्नड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांची संभाजीनगर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नती झाली आहे. लवकरच चंद्रहार ढोकणे जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सुत्रे हाती घेतली आहेत. मागील काही वर्षांपूर्वी बीड जिल्ह्यातील बीड पंचायत समिती आणि वडवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून यशस्वी काम केले होते. ढोकणे यांची उपमुख्य कार्यकारी अधिकारी पदी पदोन्नती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्वस्तरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
प्रशासकीय अधिकारी हे जनतेचा विश्वस्त व शासन जनतेचा दुवा असल्यामुळे जनतेच्या प्रशासकीय अधिकाऱ्याकडून काही आशा असतात चंद्रहार ढोकणे यांनी अत्यंत अल्पकाळात आपल्या कुशल कार्याने पूर्ण करून जनतेचे कामे केली आहेत. कामाच्या माध्यमातून त्यांची कन्नड पंचायत समितीचे कर्तबगार गटविकास अधिकारी म्हणून ओळख निर्माण झाली आहे. ढोकणे यांनी शेतकऱ्यांसाठी व सामान्य जनतेच्या साठी शासन योजना राबविल्या आहेत. कन्नड तालुक्यातील
शेतकऱ्यांना विहीरी, गायगोठे, वृक्ष लागवड, शिक्षण, सिंचन, घरकुले या योजना ठप्प झाल्या होत्या. पण चंद्रहार ढोकणे कन्नड पंचायत समितीची गटविकास अधिकारी म्हणून रुजू झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या साठी असणाऱ्या सर्व योजना राबवून घेवून सामान्य जनतेला लाभ मिळवून दिला. यावेळी त्यांनी अनेक गरजू लाभार्थी शेतकऱ्यांना विहिरी दिल्या, बेघर गरीब कुटुंबाला राहण्यासाठी घरकुल दिले. शेतकऱ्याच्या गुरांसाठी शासनाची गायगोठा योजनेचा लाभ मिळवून दिला आहे. गटविकास अधिकारी चंद्रहार ढोकणे यांच्या कुशल कार्य लक्षात घेवून शासनाने त्यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारीपदी पदोन्नतीवर बदली केली आहे. चंद्रहार ढोकणे यांनी जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार घेतला आहे. चंद्रहार ढोकणे यांची छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या उप मुख्य कार्यकारी अधिकारी पदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदन याचा वर्षाव होत आहे.

Check Also

वडिलांच्या पुण्यस्मृतींना अनोखी मानवंदना!* *पुण्यतिथीला वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न; पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी जपला वडिलांच्या मायेचा वारसा स्वर्गीय प्रकाश राठोड यांच्या स्मृतींना अन्नदानातून भावपूर्ण श्रद्धांजली*

*वडिलांच्या पुण्यस्मृतींना अनोखी मानवंदना!* *पुण्यतिथीला वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न; पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी जपला वडिलांच्या …