24/11/26

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ॲड. सुरेशराव हात्ते

बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा – ॲड. सुरेशराव हात्ते

गेवराई दि.२१(प्रतिनिधी ): सध्या बीड जिल्ह्यात झालेल्या सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पाण्याखाली गेली असून कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भाजीपाला यांसारख्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढावले आहे. परिणामी बीड जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सरचिटणीस ॲड. सुरेशराव हात्ते यांनी आपल्या सरकारकडे केली आहे.
शेतकरी संघटनांसह शेतकरी बांधवांनी राज्य सरकारकडे तात्काळ ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्याची मागणी केली आहे. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना कोणत्याही प्रकारचा निकष किंवा अटी न लावता तात्काळ मदत जाहीर करावी, अशी सर्वसामान्य शेतकऱ्यांची अपेक्षा आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील शेकडो गावांतील शेतकरी हवालदिल झाले आहेत. काही ठिकाणी घरांची पडझड तर काही भागात शेतजमिनी वाहून गेल्याची उदाहरणे दिसून येत आहेत. शेतकऱ्यांचे कर्जफेडीचे संकट अधिकच गहिरे झाले असून आगामी रब्बी हंगामासाठी पेरणी करण्याची देखील भीती शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांनी सरकारला विनंती केली आहे की, जिल्ह्यातील नुकसानीचे पंचनामे तात्काळ पूर्ण करून शेतकऱ्यांना थेट मदत पोहोचवावी. केवळ निवडक शेतकऱ्यांनाच मदत देण्यापेक्षा सर्वसामान्य शेतकरी बांधवांपर्यंत मदत पोहोचली पाहिजे अशी मागणी करुन ॲड. सुरेशराव हात्ते यांनी शेतकऱ्यांच्या या मागणीला आता सरकारने पाठबळ द्यावं. शासनाने तातडीने ओला दुष्काळ घोषित करून मदत कार्यवाही सुरु करावी, अशी मागणी केली आहे.

***

Check Also

वडिलांच्या पुण्यस्मृतींना अनोखी मानवंदना!* *पुण्यतिथीला वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न; पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी जपला वडिलांच्या मायेचा वारसा स्वर्गीय प्रकाश राठोड यांच्या स्मृतींना अन्नदानातून भावपूर्ण श्रद्धांजली*

*वडिलांच्या पुण्यस्मृतींना अनोखी मानवंदना!* *पुण्यतिथीला वृद्धाश्रमातील वृद्धांच्या ताटात अन्न; पत्रकार जयप्रकाश राठोड यांनी जपला वडिलांच्या …