05/06/26

बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात युवकाचा खून!

बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स
परिसरात युवकाचा खून!

बीड दि.२५(प्रतिनिधी)– शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरात एका युवकाचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना आज गुरुवार दिनांक २५ रोजी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान पोलिसांनी घटनेच्या अर्ध्या तासातच एका आरोपीला जेरबंद केले. यश ढाका असे मृत युवकाचे नाव असून तो पत्रकार देवेंद्र ढाका यांचा तो मुलगा आहे.
बीड शहरातील गजबजलेल्या माने कॉम्प्लेक्स परिसरात रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास काही तरुणांनी यश ढाका (वय 22 वर्ष) या युवकांवर प्राणघातक हल्ला केला. धारदार शस्त्राचे वार झाल्याने यश जागीच कोसळला. गंभीर जखमी अवस्थेत त्यास तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु डॉक्टरांनी त्याला मयत घोषित केले. यश हा अभियांत्रिकीचे (इंजिनिअरिंगचे) शिक्षण घेत होता. या घटनेची माहिती मिळताच तातडीने पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अवघ्या अर्ध्या तासात सुरज आप्पासाहेब काटे रा. बीड या आरोपीला बेड्या ठोकून शिवाजीनगर पोलिसांच्या स्वाधीन केले. ही कारवाई पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाड, उपनिरीक्षक श्रीराम खटावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक दुबाले, राहुल शिंदे आणि मनोज परजणे यांनी केली.
_____________________________

Check Also

बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला

​बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर …