01/06/26

स्मिता विष्णू वाघमारे यांना समाज बांधवांचा पाठिंबा बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीत निर्धार

स्मिता विष्णू वाघमारे यांना समाज बांधवांचा पाठिंबा

बीड शहरातील आंबेडकरी समाज बांधवांच्या निर्णायक बैठकीत निर्धार

बीडदि.२४(प्रतिनिधी)- बीड नगर परिषदेसाठी मागासवर्गीयांना आलेली अध्यक्ष पदाची संधी डावणाऱ्या सत्ताधारी प्रस्थापितांना व अजित पवार गटाला धडा शिकविण्यासाठी आज सोमवार रोजी हॉटेल नीलकमल येथे बीड शहरातील आंबेडकरवादी संघटनांच्या सर्वपक्षीय पदाधिकारी व आंबेडकरी समाज बांधवांची निर्णायक बैठक घेऊन स्मिता विष्णू वाघमारे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्णय घेण्यात घेतला.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांची बांधिलकी जोपासत समाज बांधवांच्या न्याय व हक्कासाठी रस्त्यावर उतरून लढा उभा करण्याचे काम करणाऱ्या दलित चळवळीतील पदाधिकाऱ्यांना उमेदवारी डावलून समाजाशी कसलीही बांधिलकी नसणाऱ्या व आयात केलेल्या उमेदवारास उमेदवारी जाहीर करून 40 वर्षानंतर आम्हाला मिळालेली राजकीय संधी हिरावून घेऊन मुस्लिम समाजाला उमेदवारी देण्याचे काम अजित पवार यांनी केले आहे. आंबेडकरी समाज बांधवांच्या बैठकीत पप्पूजी कागदे, अजिंक्य चांदणे, बबन वडमारे,राहुल मस्के, वसंतराव ओगले, दिनकर बोराडे,अरुण सवाई, ज्ञानोबा माने, दीपक चौगुले, नितीन सोनवणे, उत्तमराव पवार, सत्यनारायण ढाका, अनुरथ वीर, मायाताई मिसळे, आम्रपाली साबळे, भगवान कांडेकर, सिद्धार्थ शिंनगारे, नितीन वाघमारे, यांच्यासह आंबेडकरी संघटनांच्या सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांनी स्मिता विष्णू वाघमारे यांना विजयी करण्याचे आवाहन केले.
बीड नगर परिषदेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक समाज बांधवांच्या स्वाभिमानाची निवडणूक असून मागासवर्गीय उमेदवारासाठी आरक्षित असलेल्या नगर अध्यक्षपदासाठी अनुसूचित जातीच्या समाजाच्या जागेवर आयात केलेल्या उमेदवारास उमेदवारी देऊन भू-मापिया, रेती माफिया व गुटखा माफिया यांच्या ताब्यात बीड नगर परिषद देण्यासाठी व आपल्याला संविधानाच्या माध्यमातून मिळणाऱ्या आरक्षणाच्या हक्क व अधिकारापासून वंचित ठेवण्याचे काम करणाऱ्या अजित पवार यांच्यासह अमरसिंह पंडित, आ. विजयसिंह पंडित यांनी घेतलेल्या निर्णयाला नेस्तनाबूत करण्यासाठी समाजाची एकजूट महत्वाची आहे. बीड नगर परिषदेच्या निवडणुकीत आंबेडकरी समाज बांधवांनी राजकीय ताकद निर्माण करण्यासाठी अजित पवार गटाच्या घड्याळ या चिन्हाच्या उमेदवाराला पराभूत करून, स्मिता विष्णू वाघमारे यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करण्याचा निर्धार आंबेडकरी चळवळीतील सर्वपक्षीय पदाधिकारी व आंबेडकरी समाज बांधवांनी बैठकीत निर्णय घेवून केला.
या निर्णायक बैठकीस राजू जोगदंड, आशिष चव्हाण, भास्कर सरपते, यशवंत कदम,किसन तांगडे, सुभाष लोणके, अशोक ठोकळ, रवी वाघमारे, हनुमंतराव कांबळे,डी.जी वानखेडे, गौतम सोनवणे, प्रा. बाळासाहेब वाघमारे, प्रा. विठ्ठल गाडे, प्रा. सिरसाट, आदमाने, रमेश माटे, शाहू डोळस, नाना मस्के, महेश आठवले, अनिल बोराडे, संगीता वाघमारे, अरुणाताई आठवले, रेश्माताई जोगदंड,अनिताताई डोंगरे, शोभा गलांडे, शेख भाभी, सुभाष तांगडे, ॲड.सुरेश वडमारे,ॲड. तेजस वडमारे,ॲड. देवत्त शिंदे, ॲड. राहुल साळवे,ॲड. अशोक वाघमारे,ॲड.दीपक ससाणे, सुर्यकांत जोगदंड, मधुकर लोंढे, अशोक वीर, प्रकाश वक्ते, बंडू विसर्जन अविनाश जोगदंड प्रभाकर चांदणे, संभाजी गायकवाड, नागेश दुबळे, विलास जोगदंड, संजय हनवते, भारत कांबळे, भैय्या साळवे, गौतम धन्वे, प्रा.बाळासाहेब गव्हाणे, अक्षय कांबळे, महेंद्र वडमारे, अक्षय कोकाटे, भैय्या मस्के, रतन वाघमारे,नामदेव वाघमारे, सतीश शिनगारे, शाम वीर, गौतम कांबळे, सोनू वडमारे, यांच्यासह बीड शहरातील आंबेडकरी संघटनांचे सर्व पक्षी पदाधिकारी व आंबेडकरी समाज बांधव या निर्णायक बैठकीस हजारोच्या संख्येने उपस्थित होते.

काळ्या फिती तोंडाला बांधून अजित पवारांचा निषेध

बीड नगर परिषद निवडणूकीत अजित पवार गटाने आंबेडकरी समाजाला, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने, आंबेडकरी समाज बांधवांकडून तोंडाला, काळ्या फीती बांधनू जाहीर निषेध केला.

 

 

 

 

Check Also

बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर सोशल मीडियातून सडकून टीका; १४-१५ वर्षांच्या कष्टाच्या कमाईवर चोरांचा डल्ला

​बीड पोलिसांच्या ‘आश्वासनांचे’ श्राद्ध! पत्रकार आत्माराम वाव्हळ यांची दुचाकीनंतर आता मोबाईललाही ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ पोलिसांच्या हतबलतेवर …