20 डिसेंबरची निवडणूक अमृत काका सारडा यांच्यासाठी फक्त औपचारिकता?
अमृत काका सारडा यांच्या विजयावर २० डिसेंबर रोजी शिक्कामोर्तब होणार!
विजयाचा गुलाल उधळण्यासाठी कार्यकर्त्यांची जय्यत तयारी
काकांना प्रत्येक जण म्हणतो “गुलाल आपलाच”
बीड, दि. १७ (प्रतिनिधी) —
बीड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३-ब मधील निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी या प्रभागासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासूनच संपूर्ण बीड शहराचे लक्ष या एकाच प्रभागाकडे लागले असून, ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरण्याची चिन्हे दिसत आहेत. या चुरशीच्या लढतीत
भाजपचे अधिकृत उमेदवार अमृत काका सारडा हे बहुमताने विजयी होतील असा विश्वास या प्रभागातील मतदारांनी व्यक्त केला आहे.
बीड नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३-ब मधील निवडणूक अंतिम टप्प्यात पोहोचली असून या साठी शनिवार, दि. २० डिसेंबर २०२५ रोजी या प्रभागासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. या प्रभागात अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अमर नाईकवाडे आणि भाजपचे अधिकृत उमेदवार अमृत काका सारडा हे दोन मातब्बर उमेदवार आमनेसामने असल्याने राजकीय वातावरण तापले आहे. त्यामुळेच या प्रभागातील लढत प्रतिष्ठेची आणि लक्षवेधी ठरली आहे. भाजपचे उमेदवार अमृत काका सारडा यांनी प्रचारात चांगलाच झंझावात निर्माण केला असून, सत्तेत नसतानाही त्यांनी यापूर्वी सर्वसामान्य नागरिकांसाठी केलेली कामे मतदारांच्या स्मरणात आहेत. बेरोजगार युवकांना रोजगार उपलब्ध करून देणे, गरजू व आजारी नागरिकांना आर्थिक मदत करणे, तसेच सामाजिक बांधिलकीतून विविध प्रश्न सोडविण्याचा त्यांचा पूर्वीचा अनुभव त्यांच्या बाजूने जात असल्याचे चित्र आहे.
प्रभाग क्रमांक ३-ब मधील मतदारांमध्ये “अमृत काका सारडा हे केवळ उमेदवार नसून आमच्या कुटुंबातील सदस्य आहेत” अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे मतदार केवळ राजकीय लढत म्हणून न पाहता, आपल्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न म्हणून पाहत असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. ही निवडणूक जनतेने आपल्या हाती घेतल्याने आता निवडणूक फक्त औपचारिक राहिली आहे. या पार्श्वभूमीवर, प्रभागात अमृत काका सारडा यांच्या विजयाबाबतची चर्चा सध्या जोर धरू लागली असून, २० डिसेंबर रोजी त्यांच्या विजयावर शिक्कामोर्तब होणार असल्याचे मतदारातून बोलले जात आहे. त्यामुळे २० डिसेंबर रोजी होणारे मतदान हे अमृत काका सारडा यांच्या विजयावर शिक्कामोर्तब करणारे आहे. अमृत काका सारडा यांच्या कार्यकर्त्यांनी तर गुलाल उधळण्याची तयारी करून ठेवली आहे. 21 डिसेंबर रोजी गुलाल आपलाच आहे असे म्हणत कार्यकर्ते निकाल आधीच आनंद साजरा करत आहेत.
___________________________
Sangharsh Yatra www.sangharshyatra.com