21/06/25

माजी आमदार आदिनाथराव नवले भाजपाचे एकनिष्ठ तपस्वी अमृत महोत्सवानिमित्त माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचे गौरवोद्गार

माजी आमदार आदिनाथराव नवले भाजपाचे एकनिष्ठ तपस्वी
अमृत महोत्सवानिमित्त माजी मंत्री प्रा. सुरेश नवले यांचे गौरवोद्गार

बीड दि.१०(प्रतिनिधी ):- माजी आमदार आदिनाथराव नवले पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त अमृत महोत्सव कार्यक्रम अमृत मंगल कार्यालय बीड येथे दि. 05/06/2024 रोजी आयोजित करण्यात आला होता.
माजी आ. आदिनाथराव नवले यांनी 75 व्या वर्षात पर्दापण केल्यामुळे नवले परिवाराच्या वतीने अभिष्ठचिंतन सोहळा आयोजित करण्यात आला. या सोहळयाला समाजातील सर्व नेतेमंडळी, प्रतिष्ठीत नागरिक, महिला-भगिनी व नवले परिवारावर प्रेम करणारे सर्व आप्तेष्ठ सर्वांची उपस्थिती होती. उपस्थित सर्वांनी नवले पाटलांना दिर्घ आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. तसेच वृक्षमित्र अभिमान खरसाडे यांना 75 व्या वाढदिवसानिमित्त 75 वृक्ष पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भेट देण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री प्रा. सुरेश नवले , माजी आ. राजेंद्र जगताप व सर्व मान्यवरांच्या हस्ते सामुहिक सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी बोलताना प्रा.सुरेश नवले म्हणाले की, माजी आ.आदिनाथराव नवले हे 1977 साली जनता पार्टीकडून निवडून आले , गेली 48 वर्षांपासून भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून पक्षाबरोबर एकनिष्ठ राहून काम करत आहेत. आम्ही विद्यार्थी दशेत असताना आदिनाथ नवले पाटील यांनी आमदार असताना आम्हाला खुप सहकार्य केले. त्यांनी अनेक विकासाची कामे केली, नारायणगडावर रस्ता, वीज, पाणी त्यांच्या काळात ही कामे झाली. अतिशय सात्विक व प्रमाणिक राजकारणी असा उल्लेख त्यांनी केला. निस्वार्थी राहून पक्षाकडून कुठलीही अपेक्षा न ठेवता पक्षाचे काम केले. तसेच जिल्हयातील भारतीय जनता पार्टीचे एकनिष्ठ तपस्वी असा उल्लेख त्यांनी केला.
माजी आ. राजेंद्र जगताप यांनी बोलताना म्हणाले की, नवले पाटील हे इमानदार व एकनिष्ठ नेते म्हणून उल्लेख केला व त्यांना दिर्घायुष्याच्या शुभेच्छा दिल्या.
तसेच भाजपा नेते विजयकुमारजी पालसिंगनकर व ॲड. बालासाहेब कोल्हे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. या अमृत महोत्सवाच्या सोहळयाला भाजपा नेते नवनाथ शिराळे, दिनकररावजी कदम, चंद्रकांतजी नवले, सखारामजी मस्के, विलास बापू बडगे, राजेंद्र जव्हेरी, गजानन जगताप, दत्ता नलवडे, वचिष्ठ नवले, चंद्रसेन नवले, शिवाजी नवले, अभिमान खरसाडे आदि मान्यवर बहुसंख्येने उपस्थित होते.

Check Also

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ. विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा निधी पावसाळी अधिवेशनात मंजूर करून घेणार – आ. विक्रम काळे*

महाराष्ट्र राज्य कृती समितीच्या पदाधिकाऱ्यां समवेत शिक्षक आ.विक्रम काळे यांची बैठक संपन्न* *टप्पा वाढीसाठी लागणारा …